संगमनेरात साडेसहा लाखांची दारू जप्त ! एकाविरुद्ध गुन्हा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-पुण्याच्या भरारी पथकाने बेकायदेशीररित्या दारुची वाहतुक करणाऱ्या टेम्पोला पकडून या टेम्पोतून ६ लाख ६० हजार ४३० रुपयांची दारू टेम्पोसह जप्त केली.

ही घटना मंगळवारी सायंकाळी तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर घडली. संगमनेर तालुक्यातून एका वाहनातून मद्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना समजली.

ही माहिती मिळताच पुणे येथील उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी हिवरगाव पावसा येथे ही कारवाई केली. या गावातील टोलनाक्याजवळ उभ्या असलेल्या एका वाहनाबद्दल उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना शंका आली. त्यांनी या वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या आतमध्ये चोर कप्पे केलेले दिसून आले.

या कप्प्यामध्ये गोण्यांमध्ये गोवा राज्यनिर्मीती व परवानगी असलेल्या मॅकडॉवेल नंबर वन व्हिस्की या बॅ्रण्डच्या १२०० सिलबंद बाटल्या व दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशनिर्मीत व विक्रीस परवानगी असलेल्या रॉयल स्पेशल व्हिस्की या ब्रॅण्डच्या ४८ सिलबंद बाटल्या तसेच वेगवेगळ्या ब्रॅण्डची विदेशी मद्याची झाकणे आढळली.

या अधिकाऱ्यांनी सर्व मुद्देमाल जप्त करुन जप्त केलेले वाहन व मद्याच्या बाटल्या शहरातील शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात आणल्या. रात्री उशिरापर्यंत बाटल्यांची मोजणी सुरु होती.

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वाहनचालक हंसराजभाई मोहनभाई ठाकूर (वय २८, रा. खोडीयार मंदीराजवळ चलथान, ता. पलसाता, जिल्हा सुरत, गुजरात) याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९चे कलम ६५ अ, ई, ८१, ८३, ९० व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Comment