घोड चे आवर्तन दोन दिवसांत न सोडल्यास रास्ता रोको…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-या वर्षी घोड धरण समाधानकारक पावसामुळे पूर्णपणे भरले होते. धरण पुर्ण भरल्यानंतर सर्वसाधारणपणे रब्बीसाठी दोन व उन्हाळ्यासाठी दोन आवर्तने सोडली जातात.

तथापी चालू वर्षी अद्यापपावेतो रब्बी पिकांसाठी एकही आवर्तन घेण्यात आलेले नाही. सध्या आवर्तन लांबल्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे गहु, कांदा, हरबरा, फळबागा, हिरव्या चाऱ्याची पिके तसेच उसाचे पिक संपुर्णपणे धोक्यात आलेले आहे.

आधीच कोरोनामुळे शेतकरी मोडून पडला असताना आता हे पिकही गेल्यास शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही असे जमलेल्या पाणीवापर संस्थांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी सर्व पाणीवापर संस्थांचे चेअरमन व घोड डावा कालवा लाभधारक शेतकऱ्यांनी दि. २५-०१-२०२१ पर्यंत आवर्तन न सोडले गेल्यास

आम्ही २६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता हक्काचे पाणी वेळेत मिळणेसाठी ढोकराई फाटा नगर दौंड रोड येथे रास्तारोको आंदोलनाचा मार्ग अवलंबणार आहोत अशा आशयाचे निवेदन मा.ना. जयंत पाटील साहेब यांच्याकडे पाठवले आहे. शासनाच्या वतीने मा. तहसीलदार पवार साहेब यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले.

यावेळी श्रीगोंदा तालुका भाजपा अध्यक्ष संदीप नागवडे, निळकंठ जंगले, नानासाहेब ससाणे, संदीप कोकाटे, नंदकुमार थोमस्कर, महेश जंगले यांसह सर्व पाणीवापर संस्थांचे चेअरमन व घोड डावा कालवा लाभधारक शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

चौकट:- आम्ही याबाबत अधिक माहिती घेतली असता घोड धरणामधून दि.२४-०१-२०२१ पासुन आवर्तन सोड्नेबाबत मा.आ. बबनराव पाचपुते साहेब यांनीही मा.ना. जयंत पाटील साहेब, यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.

तसेच सध्या घोड धरणामध्ये ४३६१.२२,एमसीएफटी उपयुक्त पाणीसाठा असुन रब्बीसाठी ११०० एमसीएफटी पाण्याची आवश्यकता भासणार आहे. व उर्वरित शिल्लक पाण्यामधुन उन्हाळ्यामध्ये दोन आवर्तने दिली जावू शकतात, अशी माहिती आ.बबनराव पाचपुते यांनी दिली.

Leave a Comment