शूर आम्ही सरदार… हेमंत दंडवते यांची अशीही एक कला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-अहमदनगर येथील कलाकार हेमंत दंडवते हे वेगवेगळ्या माध्यमातून आपली कलाकृती साकारण्यात प्रसिद्ध आहे.

कला विश्‍व प्रतिष्ठानच्या माध्यमातून अध्यक्ष हेमंत दंडवते यांनी मराठी चित्रपट मराठा तितुका मेळवावा’ (1964) मधील लौकिक देशभक्ती गीत ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुनाची भीती’ या मुळ गाण्यातील हरकती जोपासून ट्रॅकवर आपल्या सुरेल आवाजात व उत्तम अभिनयातून सिनेमॅटोग्राफी कला सादर केली आहे.

यासाठी त्यांनी अतिशय मेहनत घेऊन गाण्याच्या छायाचित्रणासाठी स्वतःच दिग्दर्शन केले आहे, विशेष म्हणजे कृष्णधवल मध्येच हे गाणे छायाचित्र केले आहे, त्यामुळे छायांकन पाहण्यास एक वेगळाच आनंद मिळेल. 26 जानेवारी गणराज्य दिनी हे गाणे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यामांंवर प्रकाशित होणार आहे,

तरी सर्व गान प्रियकरांनी याचा आनंद घ्यावा, असे श्री.दंडवते यांनी आवाहन केले आहे. गाण्याचे छायाचित्रण / व्हिडिओ संपादक जीत मोशन ग्राफिक्स, ध्वनी एमके स्टुडिओ यांनी तर वेशभूषा उदय ड्रेसवाला, मेकअप नेहा दंडवते यांनी केले तर आहे तर सहकलाकार श्रीमती विद्या तन्वर, कु.सृष्टी कुलकर्णी यांनी काम केले.

तसेच आंतरराष्ट्रीय सुफी गायक पवन नाईक, वाजीद खान, कुबेर ग्रुप, शांती ऑडीओ, सुनील महाजन, अजित गुंदेचा, प्रशांत नेटके, सुफी सय्यद, ज्ञानेश्‍वर काळे यांचे सहकार्य लाभले. हेमंत दंडवते हे दिव्यांग मुलांच्या समाज कार्यातही अग्रेसर असतात, कला क्षेत्रात त्यांचे आत्तापर्यंत लिम्का बुक व इतर असे एकूण सहा विश्‍व विक्रमात नोंद झाली आहे.

Leave a Comment