फसवणूक करणाऱ्या ‘त्या’ मल्टीस्टेटच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- मुदत ठेवीवरील अकर्षक व्याजदर व परतावा देण्याचे अमिष दाखवून मुदतठेवीवरील दोन लाख रुपये परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी वि.दा.सावरकर मल्टीस्टेट को.सोसायटी शाखा जामखेडच्या मॅनेजिंग डायरेक्टरसह एकुण पाच जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शाखा मॅनेजर वैभव रघुवीर देशमुख, कॅशियर विकास नानासाहेब कुलकर्णी, क्लार्क शेखर प्रमोद वायभट तिघे (रा.जामखेड), मॅनेजिंग डायरेक्टर प्रमोद बालाजी निमसे व गणेश शंकर थोरात (दोघे रा.केडगाव,नगर) अशा एकुण पाच जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी उमेश विठ्ठल देशमुख (रा.जामखेड) यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दोन वर्षापूर्वी जामखेड शहरात वि.दा. सावरकर मल्टीस्टेट को.ऑपसोसायटीची शाखा सुरू झाली होती. या शाखेत २०१८ सालापासुन मुदत ठेवीवर आकर्षक व्याजदरासह परतावा देण्याची जाहीरात आली होती.

या जाहिरातीमध्ये पैशाच्या ठेवीवर आकर्षक व्याजदर व परतावा देण्याचे ठरले होते. यामुळे उमेश देशमुख यांनी या शाखेत दोन लाख रुपये १३ महिन्यांच्या मुदतीवर फिक्स डिपॉझीट ठेवले होते. याची मुदत संपल्यानंतर ते बँकेत पैसै आणण्यासाठी गेले असता सदरची बँक दिवाळखोरीमध्ये निघाली आहे असे बँकेतील कर्मचाऱ्यांकडुन समजले.

वेळोवेळी पैशाची मागणी करुनही संबंधित बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडुन पैसै मिळाले नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी दि.२० रोजी जामखेड पोलिस स्टेशनला या प्रकरणी फीर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पाच जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment