अहमदनगर ब्रेकिंग ! कोयत्याने वार करून एकाचा निर्घृण खून

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यातील घोसपुरी शिवारात राहणारे गोरख भोसले हे शेतकरी दळण दळण्याकरिता रस्त्याने जात असताना त्यांच्या मोटरसायकलला मेंढरू आडवे टाकून रस्ता अडवून मागील भांडणाच्या कारणावरुन मारहाण सुरू केली.

तेव्हा चुलता विकास हरिभाऊ भोसले, रा. खरातवाडी, ता.श्रीगोंदा हे तेथे आले असता आरोपींनी त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जिवे ठार मारुन खून केला.

तसेच मीनाक्षी गोरख भोसले यांच्या मुलास व पतीस डोक्यावर कानाच्या पाठीमागे मारून गंभीर जखमी करुन बेशुद्ध पाडले. या मारहाणीत विकास हरिभाऊ भोसले हे ठार झाले असून जखमी सोनाक्षी गोरख भोसले,

धंदा शेती व मेंढपाळ या महिलेच्या फिर्यादीवरुन मारहाण करणारे आरोपी विठोबा जयसिंग भोसले, सुवर्णा विठोबा भोसले, नितीन (नाव बदललेले अल्पवयीन आरोपी) सर्व रा. घोसपुरी,

ता. नगर यांच्या विरुद्ध नगर तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी नगर ग्रामीणच्या डिवायएसपी प्रांजली सोनवणे यांनी भेट दिलो. सपोनि सानप हे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Comment