कावळ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ, रिपोर्ट येताच..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- संगमनेर पठारातील घारगावमध्ये मंगळवारी कावळ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. तपासणीसाठी नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते.

शुक्रवारी घारगावचा १० किलोमीटर परिसर अलर्ट झोन घोषित करण्यात आला असतानाच अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे अधिकारी व ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर कावळा मृतावस्थेत आढळल्याने पंचायत समितीच्या पशुधन विभागाने उपाययोजना राबवत नगरच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाला हा परिसर अलर्ट झोन घोषित करण्यासाठी अहवाल दिला.

परिसरातील पोल्ट्रींना स्वच्छतेच्या सूचना देण्यात आल्या. १५-२० चिकन शॉप बंद करण्यात आले. पशुधन विभाग अधिकारी डॉ. प्रशांत पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली घारगावचे पशुधन विकास अधिकारी डॉ. वाकचौरे,

पशुधन पर्यवेक्षक डी. एम. भागवत, परिचर नीलेश जाधव, सुपेकर यांनी दक्षता घेतली होती. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Leave a Comment