अहमदनगरच्या ‘ह्या’ हॉस्पिटलच्या नव्या इमारतीचे शरद पवारांच्या हस्ते उद्या लोकार्पण !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-अत्याधुनिक उपचारांच्या सुविधेमुळे नगरच्या आरोग्य क्षेत्रात अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेल्या येथील ‘सुरभि हॉस्पिटल’ मधील नव्या प्रशस्त अशा २०० खाटांच्या विस्तारित रुग्णालयाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते येत्या रविवारी दुपारी १.३० वाजता होणार असल्याची माहिती ‘सुरभि’चे वैद्यकीय संचालक डॉ.राकेश गांधी यांनी दिली.

औरंगाबाद रस्त्यावरील गुलमोहर रोड कॉर्नर येथे होत असलेल्या या सोहळ्याचे अध्यक्षस्थान आ.अरुणकाका जगताप भूषविणार असून पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ, ना. बाळासाहेब थोरात, ना.शंकरराव गडाख, ना.प्राजक्तदादा तनपुरे, खा.सुजय विखे पाटील, खा.सदाशिव लोखंडे, महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह आ.संग्राम जगताप आणि जिल्ह्यातील सर्व आमदार व नेते उपस्थित राहणार आहेत.

सुरभी हॉस्पिटलची रूजुवात नगर शहरात २०१८ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवली गेली. रुग्णालयातील सेवेचा प्रदीर्घ वैद्यकीय अनुभव गाठीशी असणाऱ्या फॅमिली डॉक्टर्सनी एकत्र येऊन उत्तम वैद्यकीय सेवेचं स्वप्न पाहिलं आणि ‘फॅमिली डॉक्टर’ याच संकल्पनेवर आधारित या रुग्णालयाची उभारणी केली.

सध्या ६५ खाटांचे असलेले सुरभि हॉस्पिटल नव्या विस्तारित इमारतीमुळे आता २५० खाटांच्या प्रशस्त रुग्णालयामध्ये रूपांतरित झाले आहे.अवघ्या दोनच वर्षात समाजाने दाखविलेल्या विश्वासामुळे सुरभि हॉस्पिटल प्रगतीचे हे शिखर गाठू शकले, असे डॉ. गांधी यांनी आवर्जून नमूद केले.

२५० खाटांच्या या मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ब्लड बँकेसह २० खाटांचा क्युबिकल अतिदक्षता विभाग, २५ खाटांचा अतिदक्षता विभाग, १५ खाटांचा कोरोनरी कार्डियाक युनिट, ४ बेडची बायपास रिकवरी, अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब युनिट, हृदय व झडपांच्या व सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करणारा सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग, न्यूरो ट्रॉमा केअर, ऑर्थोपेडिक अँड जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर, जनरल मेडिसिन अँड क्रिटीकल केअर युनिट,

विषबाधा, सर्पदंश, पॅरालिसिस, दमा उपचार केंद्र, कॅन्सर निदान व उपचार आणि शस्त्रक्रिया केंद्र, प्लास्टिक सर्जरी आणि पुनर्रचनात्मक सर्जरी, लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, मूत्रविकार उपचार व शस्त्रक्रिया, पोटविकार निदान व उपचार, गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, कॅप्सूल एन्डोस्कोपी, लेप्रोस्कोपिक ॲन्ड बॅरिॲट्रिक सर्जरी युनिट, मूळव्याध, भगंदर शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, वंधत्व निवारण विभाग, सर्व प्रकारच्या सोनोग्राफी, २ डी इको कार्डियाक कलर डॉप्लर,

स्ट्रेस टेस्ट, मॅमोग्राफी, डिजिटल रेडिओग्राफी, अत्याधुनिक सिटीस्कॅन मशिन, १५ खाटांचे डायलिसिस युनिट, अत्याधुनिक पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी, स्वतंत्र फिजियोथेरेपी युनिट कार्यरत राहणार आहे. रुग्ण तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया साठी ‘सुरभि हॉस्पिटल’ मध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर्स पूर्ण वेळ उपलब्ध राहणार आहेत.

Leave a Comment