ममता दीदी तुम्ही प्रभू श्रीरामाचा अपमान केला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-मध्यप्रदेश विधानसभेचे प्रोटेम स्पीकर आमदार रामेश्वर शर्मा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रामायणाची एक प्रत पाठवली आहे.

“पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रामायणाची प्रत पाठवली आहे. अपेक्षा आहे की, ममता दीदी रामायणाचे वाचन करतील,

प्रभू श्रीरामाचे चरित्र समजतील आणि य़ापुढे जय श्रीरामच्या घोषणांचा विरोध करणार नाहीत” असं त्यांनी म्हटलं आहे. रामेश्वर शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.

“राम नामाच्या जय घोषाने ममता बॅनर्जी यांना राग येतो. ममता दीदींना माझी प्रार्थना आहे, जय श्रीराम म्हणणं त्यांनी देखील शिकावं. प्रभू श्रीरामाचा विरोध करणं बंद करा.

पश्चिम बंगालमधील एका कार्यक्रमादरम्यान तुम्ही प्रभू श्रीरामाचा अपमान केला आहे. बंगालची जनता विधानसभा निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

अयोध्येत इतक्या वर्षांनंतर प्रभू श्रीरामाचे मंदिर बनत असतानाही, ममता बॅनर्जी नाराज आहेत” असं रामेश्वर शर्मा यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment