कोरोना लसीबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-देशात गेल्या १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. लसीकरणानंतर सोशल मीडियावर काही लोकांच्या मृत्यूबद्दल अनेक अफवा समोर आल्या आहेत.

मात्र, हे मृत्यू लसीशी संबंधित असल्याचे आढळले नाही. या अफवांमध्ये, लोकांना कोरोनावरील लस देऊ नका आणि ही लस हा धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचं उद्घाटन केलंय.

दरम्यान देशात निर्मिती होत असलेल्या लसीबाबत अनेक अफवाही ऐकायला मिळत आहेत. त्याबाबत केंद्र सरकारनं आता कठोर पाऊल उचललं आहे.

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत एक पत्र लिहिलं आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कोरोना लसीसंदर्भात अफवा पसरवणाऱ्या लोकांवर कारदेशीर कारवाई केली जाऊ शकते, अ

सं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.कोरोना लसीबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि खोट्या बातम्या रोखण्यासाठी अशा लोकांवर कारवाई होणं गरजेचं आहे.

तसंच वास्तविक तथ्यांवर आधारीत आणि विश्वसनीय सूचनांचा प्रसार करण्याचा सल्लाही केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी दिला आहे. त्यामुळे आता कोरोना लसीबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीररित्या दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.

Leave a Comment