शरद पवार यांनी केंद्र सरकारला केल हे आवाहन !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-राजधानी दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यानच्या हिंसाचारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या आंदोलनात सहभागी असलेल्या प्रामुख्याने पंजाबींना केंद्र सरकारने बदनाम करु नये, त्यांच्याकडे सामंजस्याने पहावे. पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचं पातकं मोदी सरकारने करु नये,

असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून केंद्र सरकारला कानपिचक्या दिल्या. अजूनही वेळ गेलेली नाही.

केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा. टोकाची भूमिका घेऊ नये. शेतकऱ्यांच्या रास्त प्रश्नांसंबंधित अनुकूल निर्णय घ्या, असं सांगतानाच बळाचा वापर करून निर्णय घेणं योग्य नाही.

तशी मानसिकताही ठेवू नका. एकेकाळी अस्वस्थ असलेला पंजाब आपण पाहिला आहे. तो सावरलेला आहे. पुन्हा पंजाबला अस्वस्थतेकडे नेण्याचं पातक मोदी सरकारने करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

मी यापूर्वीही शेतकऱ्यांचे मोर्चे पाहिले आहेत. अगदी मोर्च्यांवर गोळीबार झालेलाही पाहिला आहे. पण फक्त शेतकरी वर्गालाच टार्गेट करण्याचा प्रकार पहिल्यांदाच झाला आहे. शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरवणं, त्यांना पाकिस्तानी संबोधणं,

त्यांच्या झेंड्यावरून वक्तव्य करणं हा आततायीपणा आहे, असं सांगतानाच देशाच्या प्रमुखाने शेतकऱ्यांशी चर्चा करायला हवी होती. दिल्लीतच शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. चर्चा करायला हरकत नव्हती, असंही ते म्हणाले.

Leave a Comment