पोपटराव पवार म्हणतात तुम्हीही पद्मश्री होऊ शकता ! पण त्यासाठी …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- देशासह राज्याच्या राजकारणात आता तरुण पिढी उतरली असून, सरपंच पदाच्या माध्यमातून गावात चांगली विकासाभिमुख कामे केल्यास सरपंचालादेखील पद्मश्री पुरस्काराचे मानकरी होऊ शकतात, त्या दृष्टीने प्रत्येक सरपंचाने यापुढील काळात काम करण्याची गरज आहे.

गावात एकमेकांची जिरवाजिरवी करणे अथवा गावातील विकासकामे हाणून पाडण्यासाठी राजकारण करू नये, असे आवाहन आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केले.पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे एका कार्यक्रमात पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी तिसगावचे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे होते.

प्रमुख मान्यवर म्हणून आमदार मोनिकाताई राजळे, महंत शंकर महाराज ससे, कल्याण महाराज शिंदे, जि.प. सदस्य पुरुषोत्तम आठरे,पं. स. सदस्य सुनील परदेशी, सरपंच कानिफ पाठक, उपसरपंच राजेंद्र पाठक, वृद्धेश्वर कारखान्याचे संचालक शरद अकोलकर, माजी उपसरपंच इलियास शेख सर,

भाऊसाहेब लोखंडे, उद्योजक शंकरराव उंडाळे, दिलीप गांधी, डॉ. योगेश पवार, लक्ष्मण पाठक, अक्षय पाठक, चेअरमन बंडू पाठक, अर्षद शेख, आदर्श शिक्षक कैलास कासार, ऋषिकेश एकशिंगे, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी सरपंच काशिनाथ पाटील यांच्या हस्ते पोपटराव पवार यांचा सन्मान करण्यात आला. श्री. पवार म्हणाले, गावचा सरपंच असो अथवा आमदार-खासदार, या लोकप्रतिनिधींना लग्नसोहळे, दहावे वर्षश्राद्ध, अशा कार्यक्रमात गुरफटून ठेवण्यापेक्षा त्यांना विकास कामे मार्गी लावण्यासाठी वेळ दिला पाहिजे.

राजकारणाचा ट्रेन आता बदलू लागला आहे, राजकारणात कोणीही एन्ट्री करू शकतं; परंतू सामाजिक कार्यासह विधायक कार्य आपल्या हातून घडावे, यासाठी राजकारण करावे. एकमेकाची जिरवाजिरवी करण्यासाठी किंवा इतरांनी केलेली विकास कामे हाणून पाडण्यासाठी राजकारण करणे योग्य नाही.

Leave a Comment