लॉकडाऊनच्या काळात लाईट बीलामध्ये 50 टक्के सूट द्यावी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांचे रोजगार, व्यवसाय बुडाला असल्याने सर्वसामान्यांसह सर्वजण आर्थिक अडचणी आलेले आहेत.

त्यात वीज वितरण कंपनीच्यावतीने सर्वसामान्यांना लाईट बील वाढवून आले आहेत. या वाढवून आलेल्या लाईट बीलामध्ये 50 टक्के सूट देण्यात यावी,

अशी मागणी मानव संरक्षण समितीच्यावतीने प्रांतधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.याप्रसंगी शहराध्यक्ष इम्रान बागवान, जिल्हा उपाध्यक्ष नसिर सय्यद,

जिल्हा जनसंपर्क अधिकारी एम.बी.जहागिरदार, भिंगार शहराध्यक्ष जहीर सय्यद, शहर उपाध्यक्ष सलिम शेख, संघटक वैभव शहाणे,जिल्हा निरिक्षक खलील पठाण आदि उपस्थित होते.

प्रांतधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या काळात लाईट बीला मध्ये 50 टक्के देण्यात यावी. या लॉकडाऊनच्या काळात लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गोर-गरीब या लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेले असून, त्यांना उदरनिर्वाहाचे कोणत्याही प्रकारे साधन नसल्याकारणाने सदरील लाईट बीलामध्येशासनाने 50 टक्के सूट देण्यात यावी जेणे करुन गोर-गरीबांचे कल्याण होईल. ही कार्यवाही लवकरात लवकर करुन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

Leave a Comment