शेतकरी आंदोलन: मोदी सरकारने ट्विटरला पाठवली नोटीस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-मोदी सरकारने शेतकरी आंदोलनावरुन ट्विटरला नोटीस पाठवली आहे. शेतकरी नरसंहार, Modi Planning Farmer Genocide असे हॅशटॅग असलेले अकाऊंटस पुन्हा ऍक्टिव्ह झाल्याने ही नोटीस मोदी सरकारने ट्विटरला पाठवली आहे.

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलं त्यादिवशी हे हॅशटॅग Active झाले होते. ज्यानंतर हे हॅशटॅग चालवणारी २५० अकाऊंट्स ट्विटरने ब्लॉक केली होती. मात्र ही अकाऊंट्स पुन्हा Active झाल्याने ही नोटीस पाठवण्यात आली आहे. केंद्र सरकारने ही अकाऊंट्स ब्लॉक करायला सांगितली होती.

तरीही ही अकाऊंट्स ट्विटरने अनब्लॉक कशी काय केली? असाही प्रश्न या नोटीशीत विचारण्यात आला आहे. जर ट्विटरने ही अकाऊंट्स ब्लॉक केली नाहीत तर त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असेही या नोटीशीत स्पष्ट करण्यात आलं आहे.

सोमवारी ट्विटरने त्यांच्या सोशल मीडियावर असलेली २५० पेक्षा जास्त अकाऊंट्स ब्लॉक केली. यामधल्या अनेक अकाऊंट्समधून तीरस्कार पसरवणारे हॅशटॅग हे ट्रेंड करण्यात आले होते. त्यामुळे ट्विटरने ही कारवाई केली होती. आता हे हॅशटॅग पुन्हा ट्रेंड होऊ लागले आहेत.

ट्विटरने सरकारच्या आदेशाचं उल्लंघन करुन ही अकाऊंट्स अनब्लॉक कशी काय केली? हा प्रश्न विचारत मोदी सरकारने ट्विटरला नोटीस पाठवली आहे. मागील सत्तर दिवसांपासून जास्त काळ शेतकरी आंदोलन सुरु आहे. सगळे कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे.

केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेच्या ११ फेऱ्या या निष्फळ ठरल्या आहेत. शेतकरी माघार घेत नाहीये आणि सरकार काही ठोस भूमिका घेत नाही. त्यामुळे एक प्रकारचा डेडलॉक निर्माण झाला आहे तो कधी संपणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Comment