अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी कारण प्रश्न आहे पाण्याचा..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-  महावितरणकडून मुळा डॅम वाहिनीच्या तातडीचे तांत्रिक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ६ फेब्रुवारीला दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत शटडाउन घेण्यात येणार आहे.

तसेच सदर शटडाउन वेळेत महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्वाची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहे. सदर कामे ही शनिवार दि.६ ६रोजी दुपारी १२ ते सायं.६ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही.

त्यामुळे शनिवार दि.६ रोजी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच स्टेशन रोड, विनायकनगर, मुकुंदनगर, केडगाव, नगरकल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर इ. भागास दुपारी १२ नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. सदरचा पाणीपुरवठा हा रविवार दि.७ रोजी करण्यात येईल.

तसेच रविवारी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, खिस्तगल्ली, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, सारसनगर, बुरुडगाव रोड परिसर व सावेडी इत्यादी भागात महापालिकेमार्फत पाणीपुरवठा करण्यात येणार नाही, या भागातील पाणीपुरवठा हा रविवार ऐवजी सोमवार दि.८ रोजी करण्यात येईल.

सोमवार दि.८ रोजी पाणीपुरवठा होवू घातलेल्या मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको, सावेडी इत्यादी भागात पाणीपुरवठा होणार नसून तो मंगळवार दि.९ रोजी करण्यात येईल.

पाणीपुरवठा एक दिवस बंद करून उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आलेले अशा भागात पाणीपुरवठा करण्याचा महापालिकेचा मानस आहे. नागरीकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून सहकार्य करावे, असे मनपाने म्हंटले आहे.

Leave a Comment