अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-कोपरगाव तालुक्यातील धामोरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत काल सकाळी अचानक कोसळली. शाळेत विद्यार्थी नसल्याने जीवित हानी टळली.

धामोरी प्राथमिक शाळेत १ली ते ५वीचे वर्ग भरतात. शाळेचा पट २७३ असुन १० शिक्षक कार्यरत आहेत. शाळेची वेळ दहा ते दोन असल्याने शाळेत विद्यार्थी नव्हते.

त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. शाळेची इमारत अतिशय जुनी म्हणजे सन १९२९ च्या दरम्यान बांधकाम झालेली आहे. सदर इमारत पूर्णपणे धोकादायक झालेली आहे.

त्याच इमारतीत हे वर्ग भरतात. शाळा पडल्याची बातमी गावात कळताच पालकांनी शाळेकडे धाव घेतली. सरपंच जयश्रीताई भाकरे, केंद्रप्रमुख विद्या भोईर यांनी घटनेची पाहणी केली.

घटनेची माहिती मुख्याध्यापक चंद्रशेखर कडवे यांनी शिक्षण विभागाला दिली. शाळेला नवीन इमारतीची सध्या नितांत गरज असल्याने जिल्हा परिषदेने नवीन इमारत मंजूर करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही तर केंद्र प्रमुख विद्या भोईर यांना विचारले असता गटशिक्षणाधिकारी आजारी रजेवर असल्याचे त्यांनी सांगितले. रजेच्या काळात कुणाकडे चार्ज आहे, याची माहिती विचारली असता भोईर यांनी माहिती नाही असे सांगितले.