Corona Live Updates : उद्यापासून सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना राज्यात बंदी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर आज सांयकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद  साधला आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का, काय बंद होणार याबाबत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. फेसबुक Live च्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे जनतेशी संवाद साधला आहे. 

आपल्या राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढतोय. कोरोनाची लाट पुन्हा आपल्या राज्यात आली की नाही हे पुढील आठ – पंधरा दिवसात कळेल. मात्र आता थोडंसं बंधन तुमच्यावर आणणं गरजेचं आहे. त्यानुसार उद्यापासून सर्व राजकीय, सामाजिक,धार्मिक मिरवणुका मोर्चे, यात्रांवर बंदीअसं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

तसेच, मी जबाबदार ही नवीन मोहीम सुरु झाली असून, मास्क घाला, हात धुवा आणि सामाजिक अंतर पाळा या तीन गोष्टी कराच. असं देखील त्यांनी सांगितलं आहे.आपण कोविड-१९ बाबत ज्या काही सूचना केल्या आहेत. त्या तंतोतंत पाळण्याची गरज आहे. तरच कोरोनाला थोपवू शकतो, अन्यथा पुन्हा कोरोनाचा धोका वाढणार हे लक्षात घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

राज्यात कोरोनाची लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, ही लाट आहे की नाही आठ ते पंधरा दिवसात समजेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मागील आठवड्यापासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून, राज्य सरकारने जिल्हा पातळीवरील यंत्रणांना तातडीने निर्णय घेऊन पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

आतापर्यंत नऊ लाखांच्या आसपास लसीकरण झालं. मास्क हीच आपली करोनाच्या लढाईतली ढाल आहे. त्यामुळे लस घेण्या अगोदर व नंतर देखील मास्क घालणं अनिवार्य आहे. शिस्त पाळणं हे आवश्यक आहे. संसर्गाची साखळी तोडायची असेल तर संपर्क टाळा. नियम मोडणाऱ्यांवार कडक कारवाई होणार. असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे.

>> उद्यापासून सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना राज्यात बंदी- ठाकरे
>> अमरावती जिल्ह्यात उद्या संध्याकाळपासून काही बंधने अंमलात आणण्याच्या सूचना
>> पुन्हा एकदा काही ठिकाणी बंधने पाळावी लागणार आहेत- ठाकरे
>> लॉकडाउन नको असेल तर शिस्त पाळणे गरजेचे- ठाकरे.
>> जे मास्क घालणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई होणारच- ठाकरे.
>> लॉकडाउन करायचा का हाच आजचा सर्वात मोठा विषय आहे- ठाकरे.

  • कार्यक्रमाला जास्त गर्दी करू नका, मास्क घाला.
  • ही बंधने असतानाही विकासकामे सुरूच होते. आता तेथेही बंधने येणार आहेत.
  • अमरावती, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये उद्या संध्याकाळ पासून बंधने लागू होणार
  • ही परिस्थिती बघता काही अटी आणि बंधने घालणे गरजेचे आहे.
  • दुसरी लाट दरवाज्यावर धक्का मारतेय
  • राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय,सध्या राज्यात 53 हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत
  • मंत्रीमंडळातील माझे सहकारीही बाधित होत आहेत
  • आता फैलाव वाढल्यास परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.
  • अमरावती सध्या कोरोनाचा कहर आहे. ही परिस्थिती वाईट आहे.
  • कोरोनाच्या वाढत्या काळात जी परिस्थिती होती, तीच परिस्थिती आज आहे. ही चिंतेची बाब आहे.
  • आपण योद्धे होत नसलो तरी कोव्हिडदूत  बनू नका, सामाजिक भान ठेवा
  • त्यांच्या मेहनतीवर आता आपण पाणी फिरवायचंं नाही.
  • योद्ध्यांनी अहोरात्र मेहनत केली,. स्वत:चे जीव गमावले. ते शहीद झाले
  • राज्यात काही दिवसांपूर्वी २ हजार रुग्ण सापडत होते. चांगलं वातावरण होतं. ही आपल्या कोव्हिड योद्ध्यांची मेहनत होती
  • कोरोना संकटात औषधे, रुग्णवाहिका, तपासणी केंद्रे, बेड यांची कमतरता होती, ही सुरुवातीची परिस्थिती होती.
  • आपल्याकडे ढाल आहे. ती ढाल म्हणजे मास्क. मास्क घालणं अनिवार्य आहे.
  • आतापर्यंत तलवार म्हणजे औषध हाती आलेले नाही. लसही धीम्या गतीने मिळत आहे.
  • युद्धात ढाल तलवारीची गरज असते.
  • कोरोनाशी जागतिक युद्ध सुरू आहे.
  • शिवरायांना वंदन करणे हे महत्त्वाचे आणि भाग्याचे काम
  • येत्या दोन महिन्य़ात आपल्याला आणखी काही कंपन्या लस देणार आहे. तेव्हा आपण सामान्यांना लस देणार आहोत.
  • येत्या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होतील
  • राहिलेल्या कोव्हिड योद्ध्यांना मी विनंती करतो की मनात किंतू परंतू न ठेवता बेध़डकपणे लस घ्या
  • 9 लाख कोव्हिड योद्धांना लस दिलेली आहे.
  • काय करावं, कसं करावं कुणालाही कळत नव्हते.
  • लॉकडाऊनचे दिवस भयंकर होते.
  • औषध तेव्हाही नव्हते, आताही नाही. मात्र लस आल्याने दिलासा मिळाला आहे.
  • जनतेच्या सहकार्याने आपण ही कोरोनाविरोधातील लढाई लढत आहोत.
  • कोरोना संकटाच्या काळात आपण जनतेशी संवाद साधत होतो
  • बंधन कोणालाही आवडत नाहीत, या सर्व संकटाला आता वर्ष होत आले आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे