वाळू उपसा व वाळूचा जाहीर लिलाव करण्यास ग्रामस्थांचा विरोध !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-भविष्यात वाळू उपस्यामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास आणि संभाव्य पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन नदीपात्रातील वाळू उपसा व वाळूचा जाहीर लिलाव करण्यास ढोरजळगाव ने ग्रामस्थांनी विरोध केला.

तालुक्यातील ढोरजळगावने येथील ढोरा नदी वरील वाळूचा जाहीर लिलाव करण्यास ढोरजळगाव ने ग्रामस्थांच्यावतीने वतीने तीव्र विरोध करण्यात आला आहे .

वाळू चोरी करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेची असल्याने शासकीय यंत्रणे मार्फत बेकायदेशीर वाळू चोरी करणाऱ्या विरुद्ध कारवाई करावी तसेच

ढोरा नदी पात्रातील वाळू चोरीस ग्रामपंचायत जबाबदार राहणार नसल्याची जाहीर करून शासकीय योजनेतील घरकुल बांधकामासाठी गावातील व्यक्तीला पाच ब्रास वाळू उचलण्यास परवानगी देण्याचा ठराव यावेळी करण्यात आला.

ढोरजळगावने ग्रामपंचायत कार्यालयात गावपातळीवरीलच संगणक परिचालक नेमणूक करण्यास परवानगी देण्याच्या ठरावही यावेळी संमत करण्यात आला.

ढोरजळगाव ने येथील ढोरा नदीपात्रातील वाळू उपसा करण्या साठी जाहीर लिलाव करण्यात यावा याकरिता महसूल विभागाच्या वतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते

ढोरजळगाव ने च्या सरपंच गौरी आनंता उर्किडे यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या विशेष ग्रामसभेस मंडल अधिकारी रमेश सावंत तलाठी प्रदीप मगर यांच्यासह माजी सरपंच गणेश कराड ,

अनंता उर्किडे, निलकंठ कराड,सुखदेव कराड ,रमेश डाके, बाळासाहेब कराड ,मधुकर कराड नामदेव केकान, ज्ञानेश्वर कराड, गोविंद उकिरडे, लहानु उकिरडे, बाबासाहेब कर्डिले, रमेश माळी,

अशोक माळी ,देविदास माळी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसेवक प्रतिभा पिसोटे यांनी प्रास्ताविक केले तसेच ग्रामसभेचे ठराव वाचन करून उपस्थितांचे आभार मानले.