निंबळकला घरोघरी शिवाजी महाराजांचे शिल्प भेट देऊन जयंती साजरी

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-निंबळक (ता. नगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती घरोघरी शिवाजी महाराजांचे शिल्प भेट देऊन साजरी करण्यात आली.

प्रारंभी गावातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दत्तू उर्फ राजू रोकडे यांनी स्व. भिमा गोविंद रोकडे यांच्या स्मरणार्थ गावात शिल्प वाटपाचा उपक्रम राबविला.

यावेळी सरपंच प्रियंका लामखडे, उपसरपंच बाळासाहेब कोतकर, सामाजिक कार्यकर्ते दत्तू उर्फ राजू रोकडे, माजी सरपंच विलास लामखडे, ग्रामपंचायत सदस्या मालन रोकडे, नामदेव चांदणे, सचिन रोकडे,

मच्छिंद्र म्हसे, चांद पटेल, भैय्या पटेल, उद्योजक अविनाश आळंदीकर, ग्रामविकास अधिकारी अनिल भाकरे, लेखक रामदास कोतकर, भगवान निमोणकर, ज्ञानेश्‍वर रोकडे, भाऊराव गायकवाड, मारुती गारुडकर, प्रमोद वाघमारे आदी उपस्थित होते.

सरपंच प्रियंका लामखडे यांनी शिवाजी महाराजांचे शिल्प भेट देऊन आगळ्या-वेगळ्या पध्दतीने शिवजयंती साजरी करण्यात आली असल्याचे सांगून उपक्रमाचे कौतुक केले. दत्तू उर्फ राजू रोकडे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली.

सर्व जाती, धर्माच्या प्रजेला त्यांनी समान न्याय देण्याचे कार्य केले. शुन्यातून विश्‍व निर्माण करणारे, परस्त्रीला मातेसमान मानणारे व अन्यायाविरोधात लढणार्‍या शिवाजी महाराजांच्या कार्यातून सतत प्रेरणा मिळण्यासाठी त्यांच्या शिल्पांची भेट देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

Back to top button