फरार बोठेच्या अडचणीत वाढ; स्टँडिंग वॉरंटवर न्यायालयाने दिला हा निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी पत्रकार बाळ बोठे हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे.

दरम्यान बोठे याने पारनेर न्यायालयाने काढलेल्या स्टॅडिंग वॉरंटविरूद्ध पुनर्निरीक्षण अर्ज जिल्हा न्यायालयात दाखल केला होता. तो अर्ज जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी फेटाळून लावला आहे.

यामुळे बोठे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी कि, 30 नोव्हेंबरला रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर बाळ बोठे पसार झाला आहे.

तो मुख्य आरोपी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालय व औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावला आहे.

पोलिसांना तो सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्याविरूद्ध पारनेर न्यायालयाकडून स्टॅडिंग वॉरंट मंजूर करून घेतले आहे. या वॉरंटला बोठे याच्याकडून जिल्हा न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

त्यावर सुनावणी घेत न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी बोठे याचा अर्ज फेटाळून लावत पारनेर न्यायालयाने दिलेला निकाल कायम केला आहे.

फरार बोठेला शोधण्यासाठी स्टॅडिंग वॉरंट जारी करण्यात आले असून बोठेच्या मागावर राज्यातील सर्वच पोलिस आहेत. तरीही पोलिसांना गुंगारा देण्यात बोठे यशस्वी होत आहे. बोठेला लवकरात लवकर गजाआड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.