अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

दरम्यान हा अपघात संगमनेर ते कोपरगाव रोडवर संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारातील समर्थ पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर घडला आहे.

या अपघातात भरत मधुकर चव्हाण (वय ४२) हा व्यक्ती मयत झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,

भरत चव्हाण (रा. तळेगाव दिघे) हे संगमनेरकडून तळेगाव दिघे गावाच्या दिशेने हे दुचाकीवरून प्रवास करीत असताना

अज्ञात वाहनाने समर्थ पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर दुचाकीस धडक दिली. या अपघातात भरत चव्हाण यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर अज्ञात वाहन चालक हा फरार झाला आहे. याप्रकरणी गणेश पांडुरंग लांडे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली असून

त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर