अहमदनगर जिल्ह्यातील सरपंचपद रिक्‍त राहिलेल्या ग्रामपंचायतींची ‘या’ दिवशी सोडत !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या होत्या.

अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीवर सरपंच व उपसरपंचाची निवड करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यातील 35 ग्रामपंचायतींची सरपंचपदे अद्यापही रिक्‍त राहिली आहे.

त्यासाठी येत्या 25 व 26 रोजी आरक्षण सोडत काढणार असल्याची माहिती महसूल उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. त्यानंतर सरपंचपदासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली.

मात्र, नंतर संबंधित संवर्गातील उमेदवार नसल्याने 35 ग्रामपंचायतींची सरपंचपदे रिक्‍त राहिली.

जिल्ह्यातील सरपंचपद रिक्‍त राहिलेल्या 35 ग्रामपंचायती खालीलप्रमाणे कोपरगाव- तिळवणी, मढी खुर्द, येसगाव.

श्रीरामपूर- गोवर्धनपूर, मातुलठाण, मांडवे, कुरणपूर. नेवासे- जळके खुर्द. राहुरी- चिंचाळे, उंबरे, वळण, मल्हारवाडी, धानोरे. शेवगाव- नवीन दहिफळ, नागलवाडी.

श्रीगोंदे- घोडेगाव, वडाळी, आर्वी. जामखेड- गुरेवाडी. कर्जत- तिखी, टाकळी खंडेश्‍वरी, पिंपळवाडी, चिलवडी.

नगर- रुईछत्तिशी, पिंप्री घुमट, धनगरवाडी. अकोले- कुंभेफळ, वाशेरे, घोडसरवाडी, जांभळे, परखतपूर, औरंगपूर, तांभोळ, इंदोरी आणि पिंपळगाव खांड.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर