जिल्ह्यात 25 टक्के प्रवेशास 402 शाळा ठरल्या पात्र

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-नगर जिल्ह्यात 402 पात्र शाळा असून त्यामध्ये 3013 जागा आहेत. या प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अंतर्गत राज्यामध्ये 1 एप्रिल 2010 पासून दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना विना अनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंसहायित शाळांमध्ये किमान 25 टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद आहे.

त्यानुसार पूर्व प्राथमिक व पहिलीच्या वर्गात मोफत प्रवेश दिला जातो. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मोफत जागांच्या 25 टक्के प्रवेशासाठी 3 मार्चपासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

तसेच जिल्ह्यात 25 टक्के प्रवेशास ४०२ पात्र असून त्यामध्ये पूर्व प्राथमिकच्या एकूण 40 व पहिलीच्या एकूण 11 हजार 883 जागा आहेत. त्यापैकी 25 टक्के कोट्यातून पूर्व प्राथमिकच्या 10 व पहिलीच्या 3 हजार 3 जागा आहेत.

पालकांनी ऑफलाईन पद्धतीने 3 ते 21 मार्चदरम्यान अर्ज भरायचे आहेत. त्यात काही अडचणी आल्यास स्थानिक मदत केंद्रावर, पंचायत समिती किंवा मनपा विभागात संपर्क करावा.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर