अतिवृष्टी: ‘या’तालुक्यास मिळाले सर्वाधिक अनुदान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-मार्च ते मे महिन्यात प्रचंड अतिवृष्टी झाल्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जोमात आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला.

यावेळी बाधीत क्षेत्राचा पंचनामा करण्यासाठी महसूल व कृषी विभागाला सूचना करण्यात आल्या. शेवगाव व पाथर्डी तालुक्यात पिके पूर्णतः वाया गेल्याने तातडीने नुकसान भरपाई मिळणे आवश्यक होते.

करिता जिल्हा प्रशासन व शासनास वेळोवेळी पाठपुरावा केला. यावेळी  शेवगाव व पाथर्डी तालुक्यासाठी  ७६ कोटी ५० लाख रुपये अनुदानाची मागणी केली.

त्याप्रमाणे या तालुक्यातील २०० पेक्षा जास्त गावातील सुमारे ९२ हजार शेतकऱ्यांना ६९ कोटी ९३ लक्ष रुपये अनुदान वितरित करण्यात आल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी केली.

शेवगाव तालुक्यातील १११ गावातील ४४ कोटी ७२ लक्ष अनुदान ५५ ८७१ तर पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या ९५ गावातील ३६ ९७२  शेतकऱ्यांना २५ कोटी २१ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे.

शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील २०० पेक्षा जास्त गावातील सुमारे ९२ हजार शेतकऱ्यांना ६९ कोटी ९३ लक्ष रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. अतिवृष्टीच्या अनुदानाचा पहिला टप्पा नोव्हेंबर २०२० मध्ये वितरित करण्यात आले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील अनुदान प्राप्त झाले असून महसूल प्रशासनाचे अनुदान वितरित करण्याचे काम चालू असून लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर  वितरीत करण्यात येईल.  असेही त्यांनी सांगितले.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर