जबरदस्त ! 1 लाख रुपये गुंतवले 40 लाख रुपये मिळाले ; 4 हजार टक्के नफा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-  जर आपण शेअर बाजारात पैसे गुंतवण्यास घाबरत असाल तर पुन्हा एकदा विचार करा, कारण येथे लवकर श्रीमंत होण्याची शक्यता असते. विनती ऑर्गेनिक्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. कंपनीच्या शेअरने गेल्या 10 वर्षात 4000 टक्के रिटर्न दिला आहे.

म्हणजेच 1 लाख रुपयांची गुंतवणूक आता 40 लाख रुपये झाली आहे. स्टॉकमधून अजूनही मजबूत नफा उत्पन्न अपेक्षित आहे. गेल्या दहा वर्षांत एफडी, टपाल कार्यालय आणि कोणतीही म्युच्युअल फंडाची योजना पाहिल्यास कोणीही 4000% परतावा दिलेला नाही. या पुढेही हा शेअर जास्त परतवा देण्याची शक्यता आहे.

11 महिन्यांत पैसे दुप्पट झाले –

विनती ऑर्गेनिक्स ही एक स्पेशियलिटी केमिकल कंपनी आहे. कोरोनाच्या संकटामुळे मार्च 2020 मध्ये शेअर बाजार खालच्या पातळीवर पोहोचला होता त्यावेळी विनती ऑर्गेनिक्सचा शेअर अगदी खालच्या पातळीवर पोहोचला होता.

तेव्हापासून आतापर्यंत विनती ऑर्गेनिक्समध्ये 127 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 127 टक्के परतावा म्हणजे गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पटपेक्षा अधिक झाले आहेत.

फेब्रुवारीत एफडीपेक्षा तीन पटीने जास्त नफा –

फेब्रुवारीमध्ये शेअरने 17 टक्क्यांचा जबरदस्त रिटर्न दिला. 17 टक्के रिटर्न एफडीसारख्या पर्यायांपेक्षा तिप्पट आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत कंपनीचा नफा 4 टक्क्यांनी घसरून 64.14 कोटी रुपये झाला. तर त्याचे उत्पन्न 6.3 टक्क्यांनी घसरून 223.47 कोटी रुपये झाले.

विनती ऑर्गेनिक्स शेअर कितीवर आहे ?

सध्या विनती ऑर्गेनिक्सचे शेअर्स सुमारे 1441 रुपये आहेत. 1 मार्च रोजी, विनती ऑर्गेनिक्सच्या समभागात शेअर बाजारात तेजी दिसून आली. 1404.35 रुपयांच्या बंद पातळीच्या तुलनेत आज सकाळी ते 1444.00 रुपयांवर उघडले. शेवटी, कंपनीचा शेअर जवळपास 2.5 टक्क्यांनी वाढून 1440.75 रुपयांवर बंद झाला. कंपनीची मार्केट कॅप 14,760 कोटी रुपये आहे.

कुठपर्यंत जाऊ शकतो शेअर ?

इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार आयसीआयसीआय डायरेक्टचा अंदाज आहे की विनती ऑर्गेनिक्सचे शेअर्स 1610 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. म्हणजेच, सध्याच्या पातळीवरून गुंतवणूकदारांना कमीतकमी 10-11 टक्के परतावा मिळू शकेल.

विनती ऑर्गेनिक्सच्या बोर्डने अलीकडेच वीरल एडिटिव्स कंपनीत विलीन करण्यास मान्यता दिली. याची वार्षिक एंटीऑक्सिडेंट उत्पादन क्षमता 24,000 टन आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|