करोना लस घेण्यासाठी आणखी दोन दिवसांची वाट पाहावी लागणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- जिल्ह्यात प्रधानमंत्री जनआरोग्य, महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य आणि आयुष्यमान भारत योजनेत 40 रुग्णालयांचा समावेश आहे.

यात चार शासकीय आणि उर्वरित 36 खासगी असून यातील चार ठिकाणी आयसीयू कक्ष नसल्याने आणि एका हॉस्पिटलने लसीकरण करण्यास असमर्थता दर्शविल्याने 31 ठिकाणी करोना लसीकरण होणार आहे.

यासाठी संबंधीत हॉस्पिटल यांना मंगळवारी लाँगिंग आणि पास वर्ड देण्यात आले आहेत. आज हे हॉस्पिटल संबंधीत लाँगिगमधून त्याकडे नागरिकांनी केलेल्या मागणीनूसार ते शासकीय यंत्रणेकडे लस पुरवठाबाबत डिमांड करणार आहेत.

जिल्हा परिषदेकडून लस आल्यानंतर खासगी हॉस्पिटलमध्ये करोना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी किमान दोन दिवसांचा कालवधी लागणार असल्याचे शासकीय आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.

दरम्यान, जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा आणि फ्रटंलाईन वर्कर यांचे करोना लसीकरण नियमित सुरू राहणार आहे. त्याचा 45 ते 60 वर्षे वय असणार्‍या सामान्य नागरिकांच्या लसीकरणाचा संबंध नसून ही प्रक्रिया पूर्णपणे वेगळी राहणार असल्याचे शासकीय आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर