खेळण्या बागडण्याच्या वयात तिच्या पायात लग्नाची बेडी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- सरकारने मुला – मुलीचे लग्न करण्याचे वय निश्चित केले आहे. अल्पवयीन वयात लग्न करणे हा कायदेशीर गुन्हा असतानाही अनेक ठिकाणी हा प्रकार घडताना दिसून येत आहे.

नुकतेच खेळण्या बागडण्याच्या वयात असलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या पायात लग्नाची बेडी अडकवली आहे. याप्रकरणी पीडितेच्या आई-वडिल, सासू- सासरे,

पतीसह सात जणांविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार व बालविवाह प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पिडीत मुलीनेच चाईल्ड लाईनच्या मदतीने फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर मधील अल्पवयीन मुलीचा विवाह जून 2020 मध्ये भिंगारमधील मुलाशी लावून दिला.

विवाह लावण्यामध्ये सदर मुलीचे आई-वडिल, मुलीचे सासू-सासरेसह सात लोकांचा सहभाग होता. लग्न झाल्यानंतर पतीपासून मुलीला गर्भधारणा झाली.

दोन महिन्याचा गर्भ पाडून टाकण्यासाठी पतीकडून छळ सुरू झाला. तसेच मुलीला पुढील शिक्षणासाठी पतीकडून विरोध होऊ लागला.

पती मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करत असल्याने पिडीत अल्पवयीन मुलीने नगरमधील चाईड लाईनशी संपर्क साधला. चाईड लाईनमधील अधिकार्‍यांनी पिडीताची बाजू समजून घेतली.

यानंतर तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे करीत आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|