स्टेट बँक ‘ह्या’ ग्राहकांना मिस कॉलवर देतेय 7.50 लाख रुपयांचे कर्ज ; जाणून घ्या…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- देशातील सर्वात मोठी बँक, भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसाठी एसबीआय निवृत्तीवेतन कर्ज योजनेचा उपयोग होतो.

या योजनेंतर्गत पेन्शनधारकांना एकाच कॉलवर लाखो रुपयांचे कर्ज मिळत आहे. या योजनेंतर्गत निवृत्तीवेतनधारक किमान 2.50 लाख आणि जास्तीत जास्त 14 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.

कर्जाचा व्याज दर 9.75 टक्के आहे. कर्जासाठी अर्ज देखील फोन कॉलद्वारे करता येईल. याशिवाय मिस कॉल किंवा एसएमएसद्वारेही कर्जासाठी अर्ज करता येतो.

एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, हॅपी रिटायरमेंट हे आता केवळ स्वप्न राहिले नाही तर बँकेच्या मदतीने खरोखर हॅप्पी करता येईल.

फक्त 7208933142 वर आम्हाला मिस कॉल द्या आणि पेन्शन कर्जाबद्दल अधिक माहिती मिळवा. हे केंद्र आणि राज्य सरकारच्या निवृत्तीवेतनधारक,

संरक्षण निवृत्तीवेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांसाठी अर्ज करू शकतात, ज्यांचे वय 76 वर्षांपेक्षा कमी आहे. एसबीआय पेन्शन कर्जाचे डॉक्यूमेंटेशन फारच कमी आहे

आणि प्रोसेसिंग फीसही कमी आहे. एसबीआय शाखेतून अर्ज केला जाऊ शकतो. ज्यांचे पेंशन खाते एसबीआय मध्ये आहे ते कर्जासाठी अर्ज करू शकतात.

मिस कॉलवर लाखो रुपयांचे कर्ज दिले जाईल :-

कर्जासाठी अर्ज कसा करावा? :- पेंशन लोन घेण्यासाठी आपण बँक शाखेत अर्ज करू शकता. याविषयी अधिक माहितीसाठी आपण 7208933142 वर एक मिस कॉल देऊ शकता. या व्यतिरिक्त आपण 7208933145 वर ‘PERSONAL’ SMS देखील करू शकता. यानंतर, बँक आपल्याला परत कॉल करेल.

केंद्र आणि राज्य सरकार निवृत्तीवेतनधारकांसाठी पात्रता :-

  • >> निवृत्तीवेतनधारकाचे वय 76 वर्षांपेक्षा कमी असावे.
  • >> पेन्शन पेमेंट ऑर्डर एसबीआयमध्ये ठेवणे आवश्यक आहे.
  • >> पेंशनर ला लेखी देण्याची गरज आहे की जोपर्यंत कर्जाचा कालावधी संपेपर्यंत तो ट्रेझरीला दिलेल्या मैंडेट मध्ये सुधारणा करणार नाही.
  • >> ट्रेझरीसही हे लिखित सहमति द्यावी लागेल की जोपर्यंत बँकेतून एनओसी जारी होत नाही तोपर्यंत पेन्शनधारकाने त्यांचे पेन्शन पेमेंट दुसर्‍या बँकेत हस्तांतरित करण्याची विनंती स्वीकारणार नाही.
  • >> कर्जाची परतफेड वयाच्या 78 वर्षांपर्यंत केली जाऊ शकते.

 डिफेंस पेंशनर्ससाठी पात्रता :-

  • >> सैन्य, नौदल आणि हवाई दल, अर्धसैनिक दल (सीआरपीएफ, सीआयएसएफ, बीएसएफ, आयटीबीपी), तटरक्षक दल, राष्ट्रीय रायफल्स आणि आसाम रायफल्ससह सशस्त्र दलामधील निवृत्तीवेतनधारक कर्जासाठी अर्ज करु शकतात.
  • >> पेन्शन पेमेंट ऑर्डर एसबीआयमध्ये ठेवणे आवश्यक आहे.
  • >> योजनेंतर्गत किमान वय निर्धारित केलेले नाही.
  • >> कर्ज प्रक्रियेच्या वेळी जास्तीत जास्त वय 76 वर्षांपेक्षा कमी असावे.

फॅमिली पेन्शनर्सची पात्रता :-

  • >> फॅमिली पेन्शनर्सनी पेंशन घेणाऱ्याच्या मृत्यूनंतर पेन्शन घेण्यासाठी कुटुंबातील अधिकृत सदस्यांचा समावेश केला.
  • >> कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांचे वय 76 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • किंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर