शिवसेनेचं खुलं आव्हान ; तर टोलनाके सुरूच करून दाखवा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-शिर्डीतील मालमत्ता धारकांकडून नगरपंचायतचे सत्ताधारी कोविड काळातील मालमत्ता कर व पाणीपट्टी सक्तीने दंड-व्याजासह वसूल करत आहे.

आता टोलनाके सुरू करण्याचा निर्णय घेऊन भक्तांकडून करवसुली करण्याचा प्रयत्न करत आहे. जर सत्ताधारी गटात हिंम्मत असेल तर टोलनाके चालु करुनच दाखवा,

असे आव्हान शिवसेनेच्या वतीने शिवसेना नेते कमलाकर कोते यांनी दिले आहे. शिवसेनेच्या भुमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दर्शविला आहे.

शिर्डी शहर शिवसेनेच्यावतीने देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिर्डी नगरपंचायतचे निष्क्रिय पदाधिकारी आपली निष्क्रियता झाकण्यासाठी घरपट्टी, पाणीपट्टी, गाळाभाडे,

साईभक्तांकडून करवसुली करून शिर्डीच्या जनतेला व साईभक्तांना लक्ष्य करून त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान नगरपंचायतने खोटी सर्वसाधारण सभा घेऊन भक्तांवर टोलनाक्याच्या माध्यमातून कर वसुली करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत.

मात्र अशी सभा झालेली नाही, कारण या सभेला 6 निवडून आलेले व 2 स्वीकृत सदस्य उपस्थित होते. हे जर खोटे असेल तर सत्ताधार्‍यांनी या सभेची चित्रफित शिर्डीकरांना दाखवावी.

गैरहजर नगरसेवकांच्या खोट्या सह्या घेऊन लूटमारीचा निर्णय घेण्यात आला आहे. या ना त्या मार्गाने पैसे वसूल करणे एवढाच सत्ताधारी व त्यांचे नेते यांनी एकमेव निर्णय घेतला आहे.

या प्रवृत्तीचा आम्ही शिवसेनेच्यावतीने निषेध करीत आहोत. सत्ताधारी गटात हिंमत असेल तर टोलनाके सुरूच करून दाखवा. शिर्डीची जनता यापुढे तुमचा अत्याचार व दादागिरी खपवून घेणार नाही,

असा सज्जड दमही शिवसेना स्टाईलने देण्यात आला आहे. सत्ताधारी गटाचा टोलनाके सुरु करण्याचा निर्णय महाविकास आघाडी हाणुन पाडणार आहे. अगोदरच शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाली आहे.

त्यात भाविकांकडुन टोल वसुल केला जाणार आहे. ही चुकीची बाब आहे. कोणत्याही परिस्थितीत टोलनाके सुरु जाणार होऊ दिले जाणार नाही. असा सज्जड दमच प्रशासनाला देण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर