स्थायी समितीच्या सभापदाची कमान राष्ट्रवादीच्या हाती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-महापालिकेतील सर्वांत मोठा पक्ष असूनही गेली दोन वर्षे शिवसेना विरोधी बाकांवर आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या नावाखाली राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना एकत्र आले असले तरी नगरमध्ये मात्र राष्ट्रवादी-शिवसेनेचं मनोमिलन झालेलं नाही.

याचाच प्रत्यय नगरमध्ये मनपाच्या स्थायी सभापदी पदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाले. महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक असूनही एकाकी पडलेल्या शिवसेनेने आज स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत अखेर माघार घेतली.

दरम्यान निवडणुकीच्या आदल्या दिवशी शिवसेनेचे तीन नगरसेवक गायब असल्याने सेनेच्या विजय पठारे यांनी माघार घेतली.राष्ट्रवादीचे अविनाश घुले बिनविरोध सभापती झाले.

आज दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सभापती निवडीसाठी सभा सुरू झाली. छाननीमध्ये दोघांचे अर्ज वैध ठरले. त्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटांची वेळ देण्यात आली.

पहिल्या पाच मिनिटांतच विजय पठारे यांनी माघार घेतल्याने अविनाश घुले यांची बिनविरोध निवड झाली. स्थायी समितीच्या सभागृहातील एकूण 16 सदस्यांपैकी शिवसेनेचे 3 वगळता 13 जण उपस्थित होते.

महापौर पदाच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीने पाठींबा दिल्यानेच भाजपचे बाबासाहेब वाकळे हे महापौर पदाच्या खुर्चीत बसू शकले.

दोन वर्षांच्या सत्ता काळात राष्ट्रवादीने भाजपला अप्रत्यक्षपणे मदत केली. राष्ट्रवादी मात्र सत्तेत सहभागी झाली नाही. याची जाण भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला आजही आहे.

स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत गरज पडल्यास भाजपने राष्ट्रवादीला मदत करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, पठारे यांनी माघार घेतल्याने ती वेळच भाजपवर आली नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर