उपसरपंच निवडीच्या वादातुन सदस्याचा खून ; एकजण जखमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  बोरगाव (ता. कवठेमहांकाळ, जि.सांगली ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीवेळी आमदार सुमन पाटील आणि खासदार संजय पाटील समर्थकांत झालेल्या

तुंबळ हाणामारीत ग्रामपंचायत सदस्य पांडूरंग जनार्दन काळे (वय ५७)यांचा खून झाला आहे. तर या मारामारीत गणेश पाटील हे आणखी एक सदस्य गंभीर जखमी झाले आहेत.

सदरची घटना ही गुरुवारी (दि. ४) दुपारी दीडच्या दरम्यान घडली. कवठेमहांकाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगवला.

बोरगाव ग्रामपंचायतीचे नामदेव पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी बुधवारी विशेष सभेचे आयोजन केले होते.

ग्रामपंचायतीमध्ये अकरा पैकी आठ सदस्य खासदार संजय पाटील गटाचे तर तीन सदस्य आमदार सुमन पाटील गटाचे आहेत.

यातील खासदार संजय पाटील गटाचे दोन सदस्य फोडून आपला उपसरपंच करण्याची रणणिती आमदार सुमन पाटील गटाने आखली होती.

उपसरपंच निवडीचा कार्यक्रम सुरु होताच ग्रामपंचायत सदस्य मतदानासाठी येत असताना ग्रामपंचायतीच्या इमारतीसमोर दोन्ही गटाचे समर्थक हाणामारी झाली.

या हाणामारीत ग्रामपंचायत सदस्य पांडूरंग जनार्दन काळे यांना काठ्यांचा मार बसल्याने गंभीर जखमी झाले. उपचारासाठी घेऊन जात असतानाच मृत्यू झाला. सदरच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर