जिल्ह्यातील ‘त्या’ खूनप्रकरणी एकास आजन्म कारावास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथील केशव दशरथ जर्‍हाड यांच्या खून प्रकरणी आरोपी अरुण हरीभाऊ तुपे (वय क्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी हा निकाल दिला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, चिचोंडी गावातील खारोळ्याच्या तळ्याजवळ २३ जुलै २०१७ ला ही घटना घडली होती. आरोपी अरूण हरीभाउ तुपे याने केशव जऱ्हाड यांना कांद्याच्या राहिलेल्या पट्टया (बिल) देण्याच्या वादातून मारहाण केली. ही घटना संजय पेंटर उर्फ संजय पेत्रस भिंगारदिवे यांनी पाहिली.

ते भांडण सोडविण्यासाठी गेले. तेव्हा आरोपी तुपे यांनी त्यांनाही दगड फेकून मारला. भिंगारदिवे यांनी तो दगड हुकविला आणि घाबरून तेथून पळून गेले. त्यांनी ही घटना पाहिल्याचे लक्षात आल्याने आरोपी तुपे त्यांचा पाठलाग करीत त्यांच्या घरी गेला. घरात घुसून आरोपीने भिंगारदिवे यांच्यावर चाकूने वार केले.

त्यात भिंगारदिवे जखमी झाले. त्यानंतर आरोपी तुपे पुन्हा तळ्याजवळ गेला. त्याच चाकूने त्याने जऱ्हाड यांच्यावरही वार केले. गंभीर जखमी झालेले जऱ्हाड यांचा मृत्यू झाला. भिंगारदिवे याने केशव जर्‍हाड यांना मारल्याचे तुपे याने प्रमोद जर्‍हाड यांना फोन करून सांगितले.

सुरूवातीला प्रमोद यांच्या फिर्यादीवरून भिंगारदिवे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, तपासाअंती केशव जर्‍हाड यांचा खून तुपे याने केल्याचे समोर आले. यानंतर तुपे याच्याविरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला. तुपे याला अटक करून त्याच्याविरूद्ध न्यायालयात दोषारोपत्र पाठविण्यात आले.

पाथर्डी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक वाय. एस. राक्षे यांनी तपास पूर्ण केला. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे यांच्यासमोर झाली. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील मंगेश दिवाणे आणि अनिल ढगे यांनी बाजू मांडली. सुनावणी दरम्यान सरकारपक्षाकडून आठ साक्षिदार सादर करण्यात आले.

त्यामध्ये प्रत्यदर्शीसह मृत जऱ्हाड यांची पत्नी, वैद्यकीय अधिकारी, पोलिस यांच्या साक्ष नोंदवल्या. त्यांची साक्ष आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी तुपे याला दोषी ठरविले. त्याला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप आणि विविध कलमान्वये एकूण २० हजार रुपये दंड अशी शिक्षा देण्यात आली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर