पेट्रोल, डिझेल 8.5 रुपयांनी होऊ शकते स्वस्त ! त्यासाठी करावे लागणार ‘हे’ ; वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  यावर्षी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी स्तरावर आहेत. पहिल्यांदाच भारतात पेट्रोल 100 रुपये प्रती लिटर विकले जात आहे. दिल्लीत प्रथमच पेट्रोल 91 रुपये आणि डिझेल 81 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे.

अशा परिस्थितीत महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8.50 रुपयांची कपात करण्याची संधी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. इंधनांद्वारे मिळणार्‍या रेवेन्यूवर कसलाही परिणाम न करता हे कट करता येईल.

 महसुलावर परिणाम होणार नाही :- आयसीआयसीआय एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की सरकारने अर्थसंकल्पात 2021-22 या आर्थिक वर्षासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील करातून 3.2 लाख कोटी महसूल मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आताच्या करानुसार सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्यूटीतून 4.35 लाख कोटी रुपये वसूल करेल.

अशा परिस्थितीत जर सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील आयात शुल्कामध्ये प्रतिलिटर 8.50 रुपयांची कपात केली तर त्याचा जे सरकारचे महसुलाचे जे टार्गेट आहे त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. ते 3.2 लाख कोटी रुपये राहील, परंतु सर्वसामान्यांना त्यातून मोठा दिलासा मिळणार आहे.

उत्पादन शुल्कात कपात करण्याची अपेक्षा :- आयसीआयसीआय सिक्युरिटीजने अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की मागणीमध्ये सुधारणा आल्याने, खासगीकरणाला प्रोत्साहन आणि महागाईवरील वाढती चिंतादरम्यान, उत्पादन शुल्कात कपात अपेक्षित आहे. परंतु ही कपात प्रति लिटर 8.5 रुपयांपेक्षा कमी असू शकते.

गेल्या वर्षी मार्च ते मे 2020 दरम्यान पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 13 रुपये आणि डिझेलमध्ये 16 रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात आली होती. सध्या पेट्रोलवर एकूण 32.90 रुपये तर डिझेलवर 31.80 रुपये प्रति लीटर उत्पादन शुल्क लागू आहे. कच्च्या तेलाची किंमत दोन दशकांपेक्षा सर्वात खालच्या पातळीवर असताना केंद्राने हा कर वाढविला होता.

परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले तेव्हा सरकारने हा कर कमी केला नाही. या कारणास्तव, पेट्रोल आणि डिझेलचे दर रेकॉर्ड पातळीवर गेले. केंद्र आणि राज्य सरकारच्या करांसह पेट्रोलवर 60 टक्के आणि डिझेलवर 54 टक्के कर आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर