ग्रामीण भागात ‘या’ चोरट्यांचा सुळसुळाट !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  दिवसेंदिवस ग्रामीण भागात चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, हे भामटे कोणत्या वस्तू चोरतील हे सांगणे अवघड आहे.

गेल्या महिना भरापासून शेवगाव तालुक्यातील बोधेगाव भागात विद्युत मोटार चोरांनी रात्री- अपरात्री शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटार, केबल आणि स्टार्टर चोरून नेत धुडगुस घातला आहे.

आधीच अनेक अडचणीत असलेला शेतकरी या चोरीच्या घटनामुळे पुरता हवालदिल  झाला आहे. पोलिसानी या चोरांचा छडा लावुन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी होत आहे.

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव लगत असलेल्या रवींद्र किसनराव घोरतळे यांनी बुधवारी दुपारी पिकांना पाणी दिले, आणि परत दुसऱ्या दिवशी दुपारी पिकांना नित्यनेमाने पाणी देण्यासाठी शेतात गेलो असता विहिरीवर तुटलेला पाईप दिसला, त्यासोबत स्टार्टर, केबल आणि पाण्यातील मोटार देखील चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.

चोरीला गेलेल्या मोटारीमुळे पिकाना पाणी देण्याचा खोळंबा झाला असुन, मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांने सांगितले. दरम्यान गेल्या महिन्याभरा पुर्वी लखमापुरी फाट्यानजिक असलेल्या

गोकुळ काकासाहेब घोरतळे यांच्या विहिरीतील सिंगल फेज एक आणि थ्री फेज एक आणि बोरमधिल एक मोटार चोरीला गेली होती. याचा तपास लागण्या अगोदर अता पुन्हा दुसरी घटना घडली असुन पोलिसा समोर याचा छडा लावण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर