कर्जप्रकरणाच्या गुन्ह्यात अटकेतील डॉ. शेळकेंच्या अडचणीत वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- शहर सहकारी बँकेतील बोगस कर्जप्रकरणाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या डॉ. निलेश शेळके याला पोलिसांनी फसवणूकीच्या तिसर्‍या गुन्ह्यात वर्ग करून घेतले आहे.

डॉ. शेळके सध्या पोलीस कोठडीत आहे. दरम्यान रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याचा शोध घेत असताना डॉ. शेळके याला पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले होते.

वैद्यकीय साधनसामुग्रीसाठी शहर सहकारी बँकेतून बोगस कर्जप्रकरण घेतल्याने डॉ. शेळके अडचणीत सापडले आहे. डॉ. रोहिणी सिनारे, डॉ. उज्ज्वला कवडे आणि डॉ. विनोद श्रीखंडे यांच्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात डॉ. शेळके विरोधात फसवणूकीचे तीन गुन्हे दाखल आहेत.

या तिघा डॉक्टरांची प्रत्येकी पाच कोटी 75 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या गुन्ह्यात त्याची चौकशी झाल्यानंतर डॉ. सिनारे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात डॉ. शेळके याला 26 डिसेंबर 2020 रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. डॉ. शेळके याला या गुन्ह्यात पोलीस कोठडीत होता.

त्यानंतर पोलिसांनी डॉ. शेळके याला डॉ. कवडे यांच्या फिर्यादीनुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात वर्ग करून घेतले. आता डॉ. शेळके याला फसवणूकीच्या तिसर्‍या गुन्ह्यात वर्ग करून घेतले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर