अर्बन बँक बोगस कर्ज प्रकरणी पोलिसांकडून दोघांना अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-बोगस कर्ज प्रकरणे करून नगर अर्बन बँकेची २२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नवनीत सुरपुरिया, कर्जदार यज्ञेश चव्हाण या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज, शनिवारी पहाटे नगर शहरात ही कारवाई केली. भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या काळात हा गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे.

सध्या बँकेचे संचालकमंडळ बरखास्त करण्यात आलेले असून प्रशासकामार्फत कारभार पाहिला जात आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

नगर अर्बन बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत प्रत्येकी ११ कोटी रुपयांची दोन बोगस कर्ज प्रकरणे करण्यात आली होती. २६ मार्च २०१८ ते २५ जानेवारी २०२१ या दरम्यान झालेल्या या प्रकाराबाबत कर्ज उपसमिती सदस्य,

बॅंकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी सहा जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. कर्ज घेणाऱ्या यज्ञेश चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण,

यज्ञेश बबन चव्हाण (तिघेही रा. संभाजीनगर, चिंचवड), मंजुदेवी हरीमोहन प्रसाद (रा. शाहूनगर, चिंचवड), रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड),

अभिजित नाथा घुले (रा. बुरूडगाव रोड, नगर), कर्ज उपसमितीचे सदस्य, नगर अर्बन को. ऑप. बँकेचे संचालक मंडळ सदस्य यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर