धक्कादायक सर्व्हे ! लग्न झालेल्या महिलांना परपुरुषाची ओढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- भारतातील ३० ते ६० वयोगटातील शहरी महिलांचा अँट्युटूड, त्यांचं शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबित्व याचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये ४८ टक्के भारतीय महिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याचं समोर आलं आहे.

यामध्ये केवळ विवाहित महिलाच नव्हे तर मुलं झालेल्या महिलांचाही यात समावेश आहे. प्रेमाला बंधन नसते तर वय जात आणि सीमा नसते असं म्हटले जाते.

परंतु सध्या प्रेमाचे रुपांतर अनैतिक संबंधात होत आहे. शारीरिक संबंध प्रस्थापित करणे म्हणजे प्रेम असा समज निर्माण झाला आहे.

अल्पवयीन मुला-मुलींना पासून ते विवाहित महिला व पुरुषांपर्यंत हा रोग पसरला आहे. आता यामध्ये महिला देखील मागे नसल्याचे दिसून आले आहे.

ग्लिडन या फ्रेन्च एक्स्टा मॅरिटल डेटिंग अॅपव्दारे एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. ग्लिडन हा प्लॅटफाॅर्म महिलांसाठी तयार करण्यात आला आहे.

या सर्वेक्षणातून एक खुलासा पुढे आली आहे. ते म्हणजे भारतातील विवाहित महिलांच्या अफेअरच्या प्रमाणात वाढ झाल्याचे समजते आहे.

ग्लिडन या फ्रेन्च एक्स्टा मॅरिटल डेटिंग अॅपव्दारे एक अभ्यास करण्यात आला या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. एका सर्वेक्षणातील माहितीनुसार ६४ टक्के महिला विवाहबाह्य संबंधामध्ये आहेत कारण त्यांना लैंगिक संबंधांमध्ये समाधान किंवा त्यांच्या पतीकडून त्यांना लैंगिक सुख मिळत नाही हे एक महत्वाचं कारण आहे.

या सर्वेनुसार, ७६ टक्के महिला या विवाहबाह्य संबंधांसाठी इच्छुक आहेत यांपैकी बहुतेक या उच्चशिक्षित आहेत. तर यांपैकी ७२ टक्के महिला या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर