लवकर करा तुमची बँकेची कामे कारण चार दिवस बँका राहणार बंद?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाला कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. खासगीकरणाविरोधात बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नऊ संघटनांनी पुढील आठवड्यात दोन दिवस संप जाहीर केला आहे. १५ आणि १६ मार्च रोजी संपाची हाक दिली आहे.

दरम्यान, १३ मार्च रोजी दुसरा शनिवार आणि १४ मार्च रोजी रविवार असल्याने सलग चार दिवस बँकिंग सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला आहे. याविरोधात सर्व बँक कर्मचारी-अधिकारी संघटना एकवटल्या आहेत. देशभरातील नऊ संघटनांनी एकत्र येत सोमवार, १५ आणि मंगळवार, १६ मार्च रोजी दोन दिवस संपाची हाक दिली आहे.

ए.आय.बी.इ.ए , आयबोक, एन.सी.बी.इ, ए.आय.बी.ओ.ए , बेफी, इन्बेफ, इन्बोक, एन.ओ.बी.डब्लू आणि नोबो या नऊ संघटनांनी युनायटेड फोरम ऑफ बँक या संघटनेच्या नेतृत्वात हा संप पुकारण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील काही बँक कर्मचारी-अधिकारी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.

वास्तविक दोन दिवस संपाची हाक देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात चार दिवस बँका बंद राहणार असल्याचे दिसून येत आहे. १५ आणि १६ मार्च रोजी संप पुकारण्यात आला आहे, तर १३ मार्च रोजी दुसरा शनिवार आणि १४ मार्च रोजी रविवार असल्याने सलग चार दिवस बँकिंग सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर गुरुवारी ११ मार्च रोजी महाशिवरात्रीची देखील सार्वजनिक सुट्टी असल्याने या आठवड्यात आणखी एक दिवस बँका बंद राहणार आहे. यामुळे बँकांच्या कामकाजवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर