राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराला ईडीने ठोकल्या बेड्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट या कायद्यांतर्गत 71 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ईडीच्या मुंबई झोनल कार्यालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले, सयाजी पांडूरंग जाधव, तानाजी दत्तू पडवळ, शैलेश पडवळ या चौघांना ईडीने अटक केली.

ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई केली आहे. पुण्यातील शिवाजी भोसले को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यासंबंधी राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अनिल भोसले आणि इतर तिघांना ईडीने अटक केली.

त्या आधी हे चौघे पुणे पोलिसांच्या कस्टडीमध्ये होते. अनिल भोसले हे राष्ट्रवादीचे आमदार असून ते दुसऱ्यांदा पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विधानपरिषदेत नेतृत्व करत आहेत.

त्यांना गेल्या वर्षी 25 फेब्रुवारी 2020 रोजी पुण्यातील शिवाजी भोसले को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यासंबंधी पोलिसांनी अटक केली होती.

आमदार अनिल भोसले हे शिवाजी भोसले को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन आणि संचालक होते. हे चौघेही शिवाजी भोसले को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली पुण्याच्या येरवडा तुरुंगात होते.

या बँकेच्या घोटाळ्यासंबंधी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये सर्वप्रथम गुन्हा नोंदवण्यात आला होता. पुणे पोलिसांच्या एफआयआरचा आधार घेऊन ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट कायद्याखाली आरोपपत्र नोंद केलं होतं.

आता त्याच आधारे अनिल भोसले यांना अटक करण्यात आली आहे. भोसले आणि इतर तिघांना ११ मार्चपर्यंत ईडीची कस्टडी देण्यात आली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|