…अन्यथा ‘त्या’ शेतकऱ्याचा महावितरण कार्यालयातच दशक्रिया विधी करू!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-नगर तालुक्यातील आठवड येथील शेतकरी नानासाहेब मोरे यांचा दि.६ रोजी विद्युत वहिनी अंगावर पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. सदर शेतकरी कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा.

अन्यथा मयत शेतकऱ्याचा दशक्रिया विधीच महावितरण कार्यालयात करू असा इशारा भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता एन.एम.धर्माधिकारी यांना दिले.

कोकाटे म्हणाले की, महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे एवढी मोठी दुर्दैवी घटना घडून एक शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त झाले असताना देखील अद्यापपर्यंत महावितरण विभागाने याबाबत कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही.

आज त्याच मयत शेतकऱ्याचे जर वीजबील थकीत असते तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्या शेतकऱ्याच्या घरी वीजबिल वसुलीसाठी, वीजपुरवठा खंडित करण्यासाठी भरमसाठ चकरा मारल्या असता आणि आज त्याच शेतकऱ्याचा महावितरण कंपनीच्या चुकीमुळे मृत्यू झाला आहे.

तरी एकाही अधिकाऱ्यांला त्या शेतकरी कुटुंबाच्या घरी जाऊन त्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी वेळ नाही. सदर विभागाचा कोणताही अधिकारी तसेच कर्मचारी या घटनेना गंभीरपणे घेत नाही. ही लाजिरवाणी बाब आहे.

सदर मयत शेतकऱ्याचा दशक्रिया विधी होण्यापूर्वी त्या शेतकरी कुटुंबाला तरतुदीनुसार आर्थिक मदत करावी. सदर घटनेची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी,

अन्यथा भाजपा नगर तालुका आठवड ग्रामस्थांच्या समवेत महावितरण कार्यालयातच दशक्रिया विधी करण्याचा इशारा या वेळी कोकाटे यांनी दिला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर