राम मंदिरासाठी ‘या’ राज्याचा सर्वाधिक निधी!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-  अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी देशभरातील अगदी गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वच नागरिकांनी राम मंदिरासाठी आपआपल्या इच्छेप्रमाणे दान दिलेले आहे.

या निधी संकलन मोहिमेत अडीच हजार कोटींचा निधी जमा झाला आहे. मात्र यात एका राज्याने सर्वाधिक दान दिल्याची माहिती समोर आली आहे.

आतापर्यंत सर्व राज्यांपैकी राजस्थानने राम मंदिर उभारणीसाठी सर्वाधिक म्हणजे ५०० कोटी रुपयांचे दान दिले आहे.  श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे महासचिव चंपतराय जयपुरला आले आणि मीडियाला सांगितलं की, देशभरात ९लाख कार्यकर्त्यांनी १० कोटी लोकांपर्यंत पोहोचून निधी जमा केला आहे.

राजस्थानमध्ये ३६ हजार गाव आणि अन्य शहरी भागांचा समावेश आहे. देशभरातील ४ लाख गावांमध्ये याबाबत जनजागृती पोहोचविण्यात आम्ही यशस्वी झालो आहे. अद्याप अनेक कुटुंबाचा निधी अजून येणे बाकी आहे.

अभियानाचे स्वयंसेवक १.७५ लाख गटात जोडलेल्या कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन ३८१२५ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निधी बँकेत जमा केला आहे.

हैद्राबादमधील एका कंपनीकडून तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून बँक आणि न्यासामध्ये एक मजबुत सेतूच्या रुपात काम केले आहे. त्यामुळेच हे काम शक्य झाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर