This Website Is Part Of TBS Media Group
अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- जिल्ह्यात शुक्रवार पर्यंत तब्बल 85 हजार जणांना लसीचा पहिला, तर 17 हजार व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे. एकूण एक लाख दोन हजार 62 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यात कोरोना पुन्हा एकदा हात-पाय पसरू लागला आहे. दरम्यान एक दिलासादायकबाब म्हणजे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम देखील सुरु आहे.
तसेच हि मोहीम अत्यंत वेगाने जिल्ह्यात सुरु आहे. जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू आहे. या मोहिमेत लसीकरणासाठी आरोग्य, महसूल, पोलिस, पंचायतराज, रेल्वे सुरक्षा दल व ज्येष्ठ नागरिक,
अशा एकूण एक लाख आठ हजार 593 जणांनी कोरोना लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. त्यातील 84 हजार 705 जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
17 हजार 357 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. एकूण एक लाख दोन हजार 62 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाची मोहीम जिल्ह्यात वेगाने सुरू आहे.
जिल्ह्यातील एकूण 33 केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. या केंद्रांना चार हजार लसी देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून, तीन हजार 630 जणांचे लसीकरण गुरुवारी पूर्ण झाले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|