सुखदवार्ता : नगरमध्ये फळांना मिळतोय उच्चांकी दर!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या फळांचा चांगले दर मिळत आहेत. मात्र सध्या उन्हाळ्याची चाहूल लागल्याने बाजारात फळांची आवक काहीशी मंदावली आहे.

परिणामी आवक कमी होत असल्याने मागणी वाढली आहे. त्यामुळेच फळांव भाव वधारले आहेत. सध्या डाळिंब १६०००, संत्रा १०,००० सफरचंद १२०००, मोसंबी ७५०० या फळांना उचांकी दर मिळत आहेत.

आज बाजारात सफरचंदापेक्षा डाळिंबाला अधिक दर मिळत आहे. मागील काही दिवसांपासून हवामानात कमालीचे बदल झाले असून, कधी कडक उन तर कधी ढगाळ वातावरण तयार होवून पाऊस देखील पडतो.

परिणामी वातावरणातील झालेल्या बदलांचा परिणाम मानवाच्या आरोग्यासह शेतीव्यवसायावर देखील होत आहे.मागील वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे फळबागधारक शेतकऱ्यांसह इतर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचे देखील प्रचंड नुकसान झाले होते.

मात्र यंदा सर्वत्रच  पाणी उपलब्ध असल्याने अनेक भागातील फळबागा चांगल्याच बहरल्या आहेत. त्यातच आता बाजारात फळांना दर देखील  चांगले मिळत असल्याने फळबागधारक शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे पडत आहेत.

येथील बाजार समितीत फळांना मिळालेले दर पुढीलप्रमाणे (सर्व दर क्विंटलमध्ये): मोसंबी २००० – ७५००, संत्रा १००० – १०,०००, डाळिंब २००० – १६०००,पपई ५०० – १५००,रामफळ २००० – ५०००,

अननस ३५० – ४५०, चिकू ५०० – २०००, द्राक्षे २००० – ३५००, अंजिर ३००० – ६०००, सफरचंद ७००० – १२०००, हापूस आंबा १५००० – २५०००, लालबाग ८००० – १२०००, पेरू १००० – ३०००.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|