कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तहसीलदारांकडून दंडात्मक कारवाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-पारनेर तालुक्यातील सुपा येथे अहमदनगर-पुणे महामार्गावर धावणाऱ्या एसटी बसेसची पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांनी झाडाझडती घेत करोना विषयक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली आहे.

अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे प्रवाश्यांमध्ये खळाळ उडाली. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सुपा येथे विविध ठिकाणी पाहणी करत नियम मोडणाऱ्या व्यवसायिक व दुकानदार यांच्यावर कारवाई केली असून नगर-पुणे महामार्गावर जाणाऱ्या प्रवासी वाहतूक बसची पाहणी केली.

त्यातील १५ ते २० प्रवाशांवर मास्क न लावल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. एसटी गाड्यांतून प्रवासी वाहतूक मोठ्या संख्येने सुरू झाली आहे. या प्रवासात करोना रोखण्यासाठी तयार करण्यात आलेले नियम धाब्यावर बसविण्यात येत आहेत.

यामुळे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. एसटीच्या गाड्यांतून प्रवास करताना कोणत्याही प्रवाशांची चाचणी होत नाही. त्यामुळे प्रवासातच करोनाची बाधा होण्याचा धोका आहे. प्रवासात सुरक्षित अंतर ठेवण्याच्या नियमाचेही पालन होत नाही.

असे चित्र सध्या दिसून येत आहे. यामुळे तहसीलदार ज्योती देवरे सुपा बसस्थानक चौकामध्ये नगर तसेच पुणे या शहरातून येणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस थांबून नियमाचे पालन न करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|