वीजचोरांवर कारवाई न केल्याने सहाय्यक अभियंत्यावरच केली ‘ही’ कारवाई!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-वीज चोरी प्रकरणात संबंधित वीजचोरांवर कायदेशीर कारवाई न करणाऱ्या सहाय्यक अभियंता सत्येंद्र सिंग यांच्यावरच महावितरणने कारवाई केली असून, अकरा हजार रुपयाचा दंड करून हा दंड त्यांच्या वेतनातून वसूल करण्याचा आदेश दिला आहे.

कर्जत उपविभागातील कर्जत एका शाखेचे एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या कालावधीमध्ये तालुक्यात वीज चोरी करणाऱ्या ६५ वीजचोरीच्या प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई करून दि.१५ जून २०२० पर्यत अहवाल सादर करण्याच्या सूचना उपकार्यकारी अभियंता यांनी दिल्या होत्या.

मात्र कर्जत येथील सहाय्यक अभियंता सत्येंद्र अनंतप्रताप सिंग यांनी याबाबत हा अहवाल सादर केला नाही.तसेच संबंधित वीज चोरावर कारवाई न केल्यामुळे सिंग यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली.

त्यावर सिंग यांनी आपला खुलासाही दिला, मात्र त्यांनी दिलेला खुलासा समाधानकारक नसल्याचे कारण देत महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी या प्रकरणात त्यांना दंड ठोठावत वेतनातून अकरा हजार रुपये रकमेचा दंड कपात करण्याचा आदेश काढला आहे.

सदर दंडाची रक्कम त्यांच्या वेतनातून कपात करण्यात यावा असाही आदेश दिला आहे. या आदेशाने यांच्या पगारातून हा दंड वसूल करण्यात आला असून, यामुळे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|