खिल्ली उडवल्यानंतर ‘ते’ ट्विट मागे घेण्याची नामुष्की

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना कठीण प्रश्नाला आधी सामोरे जावे, असा सल्ला ‘परीक्षा पे चर्चा २०२१’ या कार्यक्रमात दिला होता.

मात्र सोशल मिडीयावर यावर टीका करण्यात आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या हवाल्याने दिलेले ट्विट संदेश केंद्र सरकारच्या प्रेस इनफॉर्मेशन ब्युरोने काढून टाकले आहेत.

परीक्षेत शिक्षक व पालक ‘सोपे प्रश्न आधी सोडवा तर अवघड नंतर सोडवा’ असे सांगत असतात. पंतप्रधान म्हणून आधी अवघड विषयांना हात घालत असतो.

सकाळी उठतो तेव्हा कठीण गोष्टींचा सामना करण्यासाठी तयार असतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. यावर, मोदी यांनी उलटा सल्ला दिला, याबाबत सोशल मिडीयावर टीका करण्यात आली होती.

शालान्त परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याशी पंतप्रधान दरवर्षी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात संवाद साधत असतात. या वेळी त्यांनी आभासी पातळीवर हा कार्यक्रम घेतला.

मोदी यांच्या या संवादाची चित्रफीत प्रसारित करण्यात आली असून त्यात त्यांनी अवघड प्रश्न आधी सोडवून त्याला जास्त वेळ देण्याचे स्पष्ट म्हटले आहे.

सुरूवातीला मन ताजेतवाने असते, त्यामुळे तुम्ही अवघड प्रश्न प्रथम सोडवा. नंतर सोप्या प्रश्नांची उत्तरे लिहा असे त्यांनी म्हटले होते.

नेहमी परीक्षेत शिक्षक व पालक ‘सोपे प्रश्न आधी सोडवा तर अवघड नंतर सोडवा’ असे सांगत असतात पण मोदी यांनी उलटा सल्ला दिला, अशी प्रतिक्रिया समाजमाध्यमावर उमटली.

मोदी म्हणाले होत की, आपण पंतप्रधान म्हणून आधी अवघड विषयांना हात घातला. मी सकाळी उठतो तेव्हा कठीण गोष्टींचा सामना करण्यासाठी सदैव तयार असतो

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|