अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील त्या पत्रकार हत्येबाबत मंत्री तनपुरे म्हणाले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :-राहुरी शहरातील पञकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणात तनपुरे घराण्याचा काडीमाञ संबंध नाही आमच्या विरोधात त्यांच्याकडे पुरावे असतील

तर त्यांनी ते तात्काळ पोलिसांना द्यावेत,लवकरच पोलिस तपासात खरे काय ते समोर येईलच अस म्हणत माजी आमदार शिवाजी कर्डिलेंनी केलेल्या सर्व आरोपाचे नामदार प्राजक्त तनपुरे यांनी खंडन केले आहे.ते राहुरी येथे पञकार परिषदेत बोलत होते.

राहुरी शहरातील पत्रकार रोहिदास दातीर यांची ६ एप्रिल रोजी शहरातून अपहरण करून हत्या झाल्याची घटना घडली होती. सदर हत्या ही १८ एकर जागेच्या वादातुन झाली असल्याचा आरोप माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला आहे.

ती जागा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मेहुणे यांची आहे तर त्यासं मुलगा सोहम प्रापर्टि चे नाव देखील आहे.आणि याच प्रापर्टीतून दातीर यांची हत्या झाली आहे.म्हणून त्या हत्यामागे नामदार प्राजक्त तनपुरेंचा देखील हात आहे असा आरोप माजी आमदार शिवाजी कर्डिलेंनी केला आहे.

या सर्व आरोपाचे खंडन करताना ना. तनपुरे म्हणाले की, डॉ. तनपुरे शिक्षण संस्थेने १९९२ साली ती जागा खरेदी केलेली आहे. उताऱ्यावर डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे शिक्षण संस्था असे नाव देखील आहे.उता-यावरती जुन्या नोंदी देखील आढळून येतात.

त्याचबरोबर माझ्या मुलाच्या नावाचा देखील उल्लेख कर्डिलेंनी केला तर माझा मुलगा १४ वर्षाचा आहे.तो कुठहीही व्यवहार पहात नाही. “सोहम” प्रॉपर्टी माझ्या मेव्हण्याची आहे.त्यांची त्यात भागीदारी आहे.त्यांनी काय व्यवसाय करावा हा त्यांचा विषय आहे.

त्यांच्या व्यवसायात मी लक्ष घालत नाही. तरीसी मी सर्व कागदपत्रे आपल्याला दाखवली की रोहिदास दातीर यांचा सोहम प्रापर्टि बद्दल कधीच कुठला वाद नव्हता.

दातीर यांचा त्या १८ एकरातील काही भागातील पठारे व्यक्तीबरोबर वाद होता त्यात त्यांचा समझोता देखील झाल्याचे कागदपञे आहेत.

त्यामुळे त्याचा संमध सोहम प्रापर्टि शी जोडने अन् आमच्याशी जोडने याचा कुठेच संमध नाही आणि नगरपालिकेच्या आरक्षणावर कर्डिले बोलते तर त्यावर बोलताना तनपुरेंनी म्हणाले की, याविषयी कुठलाही विषय असला तर नगरपालिकेत त्याचा ठराव होतो.

हा विषय नगरपालिकेपुढे आल्यानंतर हे आरक्षण आपल्याला विकसित करायचे आहे असा शेवटचा ठराव २०२० साली झाला आहे. पञकार रोहिदास दातीर आणि कान्हू मोरे या दोघांनाही मी ओळखत होतो.दोघांशीही माझे चांगले संबंध होते.

तसेच पोलिस तपासात लवकरच योग्य ते समोर येनार आहे. त्यामुळे उगाच आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी माझ्यासारख्या निष्कलांकित माणसावर बिनबुडाचे आरोप त्यांनी करू नये कुठल्याही मुद्यावर राजकारण करावे ही त्यांची जुनी सवय आहे

आपल्याला राजकारणाची खूप हौस असेल तर विकासाच्या मुद्द्यावर बोलावं आमच्यावर बिनबुडाचे आरोप करू नये.असा प्रतिहल्ला राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिलेंवर केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|