खळबळजनक ! विहिरीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव मध्ये एका विहिरीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे तालुक्यातच एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,

तालुक्यातील निपाणी वडगाव लाटे वस्तीजवळ शिरसगाव पाटाच्याकडेला वळदगाव हद्दीतील सरकारी विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचा आढळून आले.

दोरीच्या साह्याने सदर मृतदेह वरती काढण्यात आला. सदर इसमाचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष आहे. मयताच्या डाव्या पायामध्ये काळा करदोरा, गळ्यामध्ये लाल रंगाचा रूमाल, पॅन्टच्या खिशामध्ये दोन पान्हे सापडले आहेत. त

सेच बाजूला पिवळ्या रंगाची टोपी व चप्पल जोड दिसत आहे. दरम्यान पोलिसांनी नागरिकांकडे सदर इसमाबाबत विचारणा केली तसेच माहिती असल्यास

श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे तसेच पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|