पालकमंत्री साहेब ऑक्सिजन सिलेंडर, रेमडीसिविर इंजेक्शन द्या नाहीतर राजीनामा द्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात तसेच शहरात रुग्णांचे नातेवाईक रेमडीसिविर इंजेक्शन साठी वणवण फिरत आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे हॉस्पिटल चे डॉक्टर हतबल झाले आहेत.

ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्यामुळे कोरोना रूग्णांना ऑक्सीजन, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नाही. हा सर्व पुरवठा व्हावा या करिता पालकमंत्री साहेब जबाबदार असतात परंतू जसा जिल्हयात शहरात रेमडीसिविर,

ऑक्सीजन तुटवडा निर्माण झाला तसे पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्ह्यातून प्रशासकीय कामातून गायब झाले आहेत.

एकीकडे पुण्यातील, नाशिक मधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्या त्या जिल्हयातील पालकमंत्री अजित पवार, छगन भुजबळ त्या जिह्यात ठान मांडून बसलेत परंतू अहमदनगर जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी वाऱ्यावर सोडलाय जिल्हाधिकारी,

प्रामाणिक पने ऑक्सिजन सिलेंडर, रेमडीसिविर इंजेक्शन पुरवठ्यसाठी प्रयत्न करत आहेत परंतू ते उपलब्ध होत नाही आहे रेमडीसिविर इंजेक्शन कोरोना रुग्णांवर सर्रास पने वापरली जात आहे.

कुठल्याही प्रकारची नियमावली आरोग्य मंत्रालया विभाग मार्फत दिली जात नाहि. त्यामुळे कुठलेही नियंत्रण या जिल्ह्यावर या पालकमंत्र्यांचे नाहि. जिल्हयात कोरोना आजारांवर उपचार घेणाऱ्य रूग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर.

तसेच रेमडीसिविर इंजेक्शनचा पुरवठा सर्वस्वी जबाबदारी हि पालकमंत्र्यांची असुन अजुन पर्यंत या उद्भवलेल्या परिस्थितीवर पालकमंत्र्यांचे एकही स्टेटमेंट नाही

जिल्हयात व शहरात ऑक्सिजन सिलेंडर, रेमडीसिविर इंजेक्शन आहेत का नाहि या कडे लक्ष्य नाही पालकमंत्री पदाची जबाबदारी लक्षात यावी त्यामुळे अहमदनगर जिल्हयातील उद्भवलेली परिस्थिती मार्गी लावण्यासाठी व पालकमंत्र्यांना जाग यावी

म्हणून मनसेच्या वतीन जिल्हयात कोरोना आजारावरील रूग्णांना उपचाराकरिता ऑक्सिजन सिलेंडर, रेमडीसिविर इंजेक्शन उपलब्ध करून द्या नाहीतर आपण अहमदनगर जिल्हा पालकमंत्री पदाचा राजीनामा द्या .

वरील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर प्रश्ना संदर्भात आपण तातडीने लक्ष्य घालावे हि नम्र विनंती अन्यथा मनसेच्या वतीन जिल्हाभर आंदोलने सुरू होतीलअशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी पालकमंत्री यांना ईमेल द्वारे मागणी केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|