‘कुकडी’चे आवर्तन शेतीसाठी मे महिन्यात सुटणार : आमदार पाचपुते

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :-कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सोडण्याबाबत तालुक्यातील पुढारी कायम श्रेयवादाची लढाई लढत असताना कुकडीचे उन्हाळी आवर्तन १० मे पासून सुटणार असल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांच्या वतीने देण्यात आली.

केवळ पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन मागणी केली असताना आमदार रोहित पवार आणि आपण आवर्तन शेतीसाठी सोडण्याची केलेली मागणी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मान्य केल्याने हे आवर्तन शेतीसाठी देखील असल्याचे सांगितले.

कुकडीच्या डाव्या कालव्याचे आवर्तन सोडण्याबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. यात आमदार बबनराव पाचपुते आणि राष्ट्रवादी चे नेते घन:श्याम शेलार सहभागी होते.

तालुक्यातील कुकडीच्या लाभ क्षेत्रात उन्हाळी आवर्तन हे पिण्याचे उद्भव भरण्यासाठी का शेतीसाठी सोडणार यावरून नेहमी चर्चा होत असते.

तालुक्यातील फळबागा क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने कुकडीच्या पाण्याचे नियोजन करताना उन्हाळ्यात सोडलेले आवर्तन नेमके कश्यासाठी सोडणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष राहते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|