राजकीय स्वार्थासाठी दिल्लीश्वरांनी कोरोनाची लाटच निर्माण केली..!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :-उद्या पश्चिम बंगाल भाजपने जिंकले तरी देशातील कोरोनाचे संकट दूर होणार आहे काय? किंवा पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला तर कोरोनाचे खापर ममता बॅनर्जींवर फोडून दिल्लीश्वर काखा झटकणार आहेत काय?,

राजकीय स्वार्थासाठी कोरोनाची पर्वा न करता दिल्लीश्वरांनी महामारीची लाटच निर्माण केली आहे, असा टोला शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून निशाणा केंद्र सरकारला लगावला आहे.

महाराष्ट्रासह इतर राज्यातही करोनाचा संसर्ग वेगानं पसरत आहेत. अनेक ठिकाणी व्हेंटिलेटर्स व बेडची कमतरता जाणवत आहे. यावरुन शिवसेनेनं केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

तसंच, पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या प्रचारावरुनही शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून टीकास्त्र सोडले आहे.

या संकटाशी सामना करण्याइतकी इच्छाशक्ती आमच्या केंद्र सरकारकडे आज उरली आहे काय? की कोरोना युद्धापेक्षा त्यांना चार राज्यांतील निवडणूक महत्त्वाची वाटत आहे? तामीळनाडू, केरळात तर भाजपचा सुपडा साफ होणारच आहे.

पुद्दुचेरी या लहान केंद्रशासित राज्यात भाजपला फार रस नसावा. त्यामुळे संपूर्ण केंद्र सरकार राजकीय आखाडय़ात उतरले आहे ते पश्चिम बंगाल जिंकण्यासाठीच. तेथेही ममता बॅनर्जी संपूर्ण केंद्र सरकारशी एकाकी झुंज देताना दिसत आहे.

कोरोनाच्या पहिल्या संकटाचे खापर सरकारने चीनवर फोडले. हे सर्व चीनच्या वुहान प्रांतातील मासळी बाजारातून पसरले. त्यामुळे जगाच्या वाताहतीस फक्त चीन आणि चीनच जबाबदार आहे हे सर्वांनीच ठरवून टाकले.

पण आता चीन कोठे आहे? चीनची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. चीनमधून करोना नष्ट झाला की काय ते सांगता येत नाही. पण चीनमधील करोनाच्या बातम्या येत नाहीत, असेही या अग्रलेखात म्हटले आहे. ज्या राज्यांत निवडणुका झाल्या किंवा होत आहेत.

तेथून किमान ५०० पट वेगाने करोनाचा प्रसार देशभरात झाला. त्यामुळे कोरोना ही नैसर्गिक आपत्ती मान्य केली तरी या नैसर्गिक आपत्तीचा सूत्रधार राजकीय मनुष्यप्राणीच आहे. बेडस्, व्हेंटिलेटर्स कमी पडत आहेत.

शववाहिन्या व स्मशानात दाटीवाटी सुरू आहे. एकाच वेळी सामुदायिक चिता भडकावून कसेरोनाग्रस्त शवांची विल्हेवाट लावली जात असताना मायबाप केंद्र सरकार प. बंगालात निवडणूक खेळात दंग आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|